घर देश-विदेश लिबियामध्ये महापुरामुळे हाहाकार; पाच हजारांहून अधिक नागरिकांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

लिबियामध्ये महापुरामुळे हाहाकार; पाच हजारांहून अधिक नागरिकांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

Subscribe

लिबियामधील डर्ना शहरातील रुग्णालय प्रमुख आणि रेडक्रॉस या सामाजिक संस्थेने 12 सप्टेंबर रोजी माहिती दिली की, या महापुरामुळे हाहाकार माजला असून, हजारो नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

नवी दिल्ली : सध्या जगात मोठ-मोठ्या घटना घडत आहेत. मोरोक्कोमध्ये झालेल्या भूकंपामुळे हजारो नागरिकांचा मृत्यू झाला होता. तर आचा लिबियामधील डर्ना शहरांमध्ये आलेल्या महापुरामध्ये तब्बल 5 हजाराहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर 10 हजाराहून अधिक नागरिक अद्यापही बेपत्ता असल्याची माहिती आहे.(Floods wreak havoc in Libya More than five thousand citizens died many are missing)

लिबियामधील डर्ना शहरातील रुग्णालय प्रमुख आणि रेडक्रॉस या सामाजिक संस्थेने 12 सप्टेंबर रोजी माहिती दिली की, या महापुरामुळे हाहाकार माजला असून, हजारो नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर लिबियामधील एका मंत्र्याने सांगितले की, चक्रीवादमुळे हा महापूर आला. या महापुरामध्ये बांध फुटले असून, यामुळे शहराचा एक चतुर्थांस हिस्सा नष्टच झाला. तर गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, भूमध्यसागरीय वादळ डॅनियलमुळे आलेल्या पुरामुळे एकट्या डेरना शहरात मृतांची संख्या 5 हजार 300 पेक्षा जास्त झाली आहे. लीबियातील इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ रेड क्रॉस आणि रेड क्रिसेंट सोसायटीज (IFRC) च्या प्रमुखांनी सांगितले की, मोठ्या पुरानंतर सुमारे 10 हजार लोक बेपत्ता झाल्याचा अंदाज आहे आणि मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

यामुळे आला महापूर

- Advertisement -

चक्रीवादळ डॅनियल आठवड्याच्या शेवटी भूमध्य समुद्रातून गेल्यानंतर पूर आला, ज्यामुळे गेल्या दोन दिवसांत लिबियासह अनेक देशांमध्ये जोरदार वारे आणि जोरदार पूर आला. 11 सप्टेंबरपासून डेरना येथे काम करत असलेल्या एका टीमने सांगितले की, 5 हजाराहून अधिक लोक बेपत्ता आहेत, तर साधारणपणे कोरड्या नदीच्या खोऱ्यात पुराचे पाणी तीव्र झाल्यामुळे सुमारे 7 हजार लोकांचा मृत्यू झाल्याची भीती आहे.

हेही वाचा : व्हिडीओ क्लिप चुकीच्या पद्धतीने संपादित करून…, मुख्यमंत्री शिंदेंनी विरोधकांचा केला निषेध

चौहीकडे फक्त मृतदेहच

- Advertisement -

लिबियाच्या पूर्वेकडे नियंत्रण ठेवणाऱ्या सरकामधील उड्डाण मंत्री हिशेम अबू यांनी सांगितले की, चौहुबाजुने फक्त मृतदेहच दिसून येत आहे. उंच इमारतीपासून तर समुद्रापर्यंत फक्त मृतदेहच विखुरलेले दिसून आले. डर्ना शहराची एकुण लोकसंख्या ही सव्वा लाख आहे. ज्यातील 20 टक्के लोक हे या महापुरामुळे बाधित झाले आहेत. मंत्र्यांनी सांगितले की, तब्बल शहाराचा तब्बल 25 टक्के भाग हा नष्टच झाला आहे. यावरून लक्षात येते की, ही केवढी मोठी हानी आहे. यासोबतच लिबियामधील आणखी एक बेनगाजी शहरही या महापुरामुळे प्रभावित झाल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा : CBI मधील भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांच्या चौकशीसाठी केंद्र सरकारच्या परवानगीची गरज नाही – सर्वोच्च न्यायालय

लिबियामध्ये अस्थिरतेचे सरकार

2011 मध्ये नाटो-समर्थित उठावापासून लिबिया राजकीयदृष्ट्या पूर्व आणि पश्चिम भागात विभागले गेले आहे. दोन गटामुळे प्रशासन आणि सार्वजनिक सेवा ठप्प आहेत. पूर्व लिबियन सरकारचे प्रमुख, ओसामा हमाद यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता नाही. आणि ते खलिफा हफ्तरच्या लिबियन नॅशनल आर्मी (LNA) द्वारे नियंत्रित देशाच्या पूर्व भागात कार्यरत आहेत. त्रिपोलीतील आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त पश्चिम भागातील सरकार पूर्वेकडील भागांवर नियंत्रण ठेवत नाही मात्र, त्यांनी डेर्नाला मदत पाठवली आहे. याव्यतिरिक्त, युनायटेड स्टेट्स आणि तुर्कीसह इतर देशांनी सांगितले की ते मदत करणार आहेत.

- Advertisment -