घरताज्या घडामोडीफ्लू आणि करोनामध्ये काय आहे फरक?

फ्लू आणि करोनामध्ये काय आहे फरक?

Subscribe

जगभरात थैमान घालणाऱ्या करोना व्हायरसला COVID-19 असेही संबोधले जात असून याची प्राथमिक लक्षणेही फ्लू सारखीच आहेत. यामुळे साधारण सर्दी खोकला जरी झाला तरी अनेकजणांची भीतिने गाळण उडत आहे. फ्लूच्या तुलनेत करोना धोकादायक असला तरी तो बरा होतच नाही किंवा जीव घेऊनच जातो. अशा अफवा सध्या पसरल्याने नागरिक सर्दी खोकल्यालाच करोना समजू लागले आहेत. हा गोंधळ टाळण्यासाठी यातील फरक समजणे गरजेचे आहे.

फ्लूच्या तुलनेत करोना व्हायरस अॅग्रेसिव्ह आहे. शिवाय तो जमिनीवर व कपड्यावर जास्त वेळ जिवित राहत असल्याने त्याची लागण संसर्गातूनच होते. आतापर्यंत जवळ जवळ एक लाख २० हजार जणांना करोनाची लागण झाली आहे. तर चार हजाराहून अधिक नागरिकांचा यात मृत्यू झाला आहे. पण असे असले तरी करोनाची प्रमुख लक्षणे सर्दी, खोकला, ताप अशी आहेत. फ्लू आणि करोना हे दोन्ही आजार संसर्गजन्य आहेत. पण करोनाची लागण झाल्यास सर्दी, खोकला, श्वास घेण्यास त्रास, ताप, अंगदुखी असा त्रास होतो. यावर वेळीच उपाय न केल्यास रुग्णाला न्यूमोनिया होऊ शकतो. असे तज्त्रांनी सांगितले आहे. करोना हा एक नोवेल व्हायरस आहे. २०१९ सालीच त्याचा शोध लागला. त्याआधी असा व्हायरस कधीही पाहीला नसल्याचे तज्त्रांचे म्हणणे आहे.

- Advertisement -

दरम्यान, इन्फ्लू्ँझा व्हायरस हा इतर व्हायरसच्या तुलनेत वेगाने पसरतो. फक्त विशिष्ट चाचण्या केल्यानंतरच करोनाची लागण झाल्याचे निदान होते. यात जर तुम्हांला साधारण फ्लू झाला असेल तर एक ते दोन दिवसात ते कळते. पण करोनाचे निदान होण्यास २ ते १४ दिवसांचा कालावधी लागतो. सध्याच्या आधुनिक वैद्यकिय उपचारांमध्ये फ्लूवर उपचार उपलब्ध आहेत. पण करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी मात्र आजही संशोधक झटत आहेत. पण त्यावर अद्यापपर्यंत तरी काहीही उपचार उपलब्ध झालेले नाही. यामुळे जर तुमच्यात रोगप्रतिकारकशक्ती उत्तम असेल तर करोनाला घाबरण्याचे कारण नाही. असे तज्ज्ञांनी सांगितले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -