घरदेश-विदेशदेशात लहरी हवामान; कुठे पाऊस, कुठे हिमवृष्टी तर कुठे कुडकुडणारी थंडी!

देशात लहरी हवामान; कुठे पाऊस, कुठे हिमवृष्टी तर कुठे कुडकुडणारी थंडी!

Subscribe

Weather Update | उत्तराखंडमध्ये काही ठिकाणी हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे. याशिवाय हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्ये हिमवृष्टी आणि पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Weather Update | नवी दिल्ली – पर्वतीय भागांवर तुफान हिमवृष्टी (Snowfall) होत असल्याने सपाट प्रदेशात थंडीने (Winter) जोर धरला आहे. उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये थंडी वाढली असून लोकांनी पुन्हा शेकोट्या पेटवायला सुरुवात केली आहे. दरम्यान, पर्वतीय भागांमध्ये मध्यम स्वरुपाची हिमवृष्टी किंवा पावसाची (Rain Expected) शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. दिल्ली एनसीआरमध्ये (Delhi NCR) सकाळपासून थंड वारे वाहत आहेत. त्यामुळे वातावरणात गारवा आहे. रविवारच्या तुलनेत सोमवारी तापमानात किंचित घट झाली आहे. एकूणच देशात लहरी हवामान आहे.

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्येही थंड वारे वाढले आहेत. थंड वाऱ्यांमुळे तापमानात किंचित घट नोंदवली जाऊ शकते, असे हवामान खात्याचे म्हणणे आहे. याशिवाय जोरदार वाऱ्यांमुळे बिहारमधील हवामानातही बदल झाला आहे. राज्याची राजधानी पाटणा आणि गयासह अनेक शहरांमध्ये कमाल तापमानात घट झाली आहे. पाटणा हवामान केंद्राने १३ फेब्रुवारीला जोरदार वाऱ्याचा इशारा दिला आहे.

- Advertisement -


उत्तराखंडमध्ये हवामान आज कोरडे राहणार आहे. मात्र, बहुतांश भागात स्वच्छ सूर्यप्रकाशही आहे. मात्र थंड वाऱ्यांमुळे अचानक थंडी वाढली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, उत्तराखंडमध्ये काही ठिकाणी हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे. याशिवाय हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्ये हिमवृष्टी आणि पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पुढील पाच दिवस अरुणाचल प्रदेशात काही ठिकाणी बर्फवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्याचबरोबर आसाम आणि नागालँडमध्ये पुढील २४ तासांत पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, येत्या तीन दिवसांत उत्तर-पश्चिम भारतात 35 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर देशातील उर्वरित राज्यांमध्ये पुढील पाच दिवस हवामान निरभ्र राहील.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -