Sunday, June 13, 2021
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE भारताच्या या ५ राज्यांना कोरोनाचा अधिक धोका; आरोग्य मंत्रालयाचा इशारा

भारताच्या या ५ राज्यांना कोरोनाचा अधिक धोका; आरोग्य मंत्रालयाचा इशारा

Related Story

- Advertisement -

भारतात कोरोनाचा वेग मंदावला असला तरी काही राज्यांमध्ये अजूनही संक्रमण होत असल्याचे लक्षात आले आहे. त्यातच सणासुदीच्या काळात लोकांचे दळणवळण वाढल्यामुळे कोरोनाचा फैलाव वाढला असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन सांगितले. केरळ, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, कर्नाटक आणि दिल्लीत सणांमुळे कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. मात्र दिलासादायक बाब अशी की, मागच्या पाच आठवड्यात कोरोनाचा मृत्यूदर कमालीचा घटला आहे. तसेच युरोप आणि अमेरिकेत आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर या राज्यांनी अधिक खबरदारी घेण्याची गरज असल्याचेही सांगण्यात येत आहे.

पाच राज्यात कोरोनाचे ४९.४ टक्के प्रकरणे

आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितले की, मागील २४ तासात कोरोनाचे ४९.४ टक्के प्रकरणे हे वरील पाच राज्यात आढळली आहेत. नवरात्रीच्या काळात ही संख्या वाढल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. आरोग्य सचिवांनी यावर गंभीर चिंता व्यक्त केली असून या पाच राज्यातील प्रमुखांशी आम्ही चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच त्यांनी सांगितले की, कोविडच्या एकूण Active प्रकरणांपैकी ७८ टक्के रुग्ण हे देशातील १० राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात आहेत.

५ आठवड्यात मृत्यू दर घटला

- Advertisement -

मागच्या २४ तासांत कोरोनामुळे झालेले ५८ टक्के मृत्यू हे वरील पाच राज्यातील आहेत. यामध्ये महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, दिल्ली, छत्तीसगढ आणि कर्नाटक या राज्यांचा समावेश आहे. दरम्यान मागच्या पाच आठवड्यापासून कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूदरात घसरण पाहायला मिळत आहे. मार्चपासून कोरोनाचे संक्रमण सुरु झाले, तेव्हापासून आतापर्यंत एक लाखाहून अधिक रुग्णांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे.

युरोप आणि अमेरिकेत सर्वाधिक संक्रमण

युरोपीयन देशांमध्ये कोरोना व्हायरसची दुसरी लाट आलेली पाहायला मिळत आहे. काही महिन्यांपासून शांत झालेला कोरोना विषाणून काही देशांमध्ये पुन्हा डोके वर काढायला लागला आहे. नीती आयोगाचे डॉक्टर व्ही. के. पॉल यांनी सांगितले की, कोरोना महामारीने युरोपमध्ये पुन्हा एकदा थैमान घालण्यास सुरुवात केल्याचे दिसत आहे. ते पुढे म्हणाले की, अमेरिकेत कोरोनाची तिसरी लाट येण्यास सुरुवात झाली आहे. दुसरी आणि तिसरी लाट आल्यानंतर या व्हायरसमुळे अधिक नुकसान होते. दोन-चार लोकांमध्ये जरी हा व्हायरस उरला असेल तरीही तो समूह संसर्गाला आमंत्रण देतो, असेही ते म्हणाले.

- Advertisement -