घरदेश-विदेशCJI Chandrachud : राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित प्रकरणांमध्येच लक्ष घाला, सरन्यायाधीशांचा सल्ला

CJI Chandrachud : राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित प्रकरणांमध्येच लक्ष घाला, सरन्यायाधीशांचा सल्ला

Subscribe

नवी दिल्ली : सीबीआय तसेच प्रमुख तपास यंत्रणांनी केवळ राष्ट्रीय सुरक्षा, देशाविरोधातील आर्थिक गुन्ह्यांचा समावेश असलेल्या प्रकरणांवरच लक्ष केंद्रित करावं, असा सल्ला सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी दिला आहे. केंद्रीय तपास यंत्रणा अर्थात CBI च्या स्थापना दिवसाच्या निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

केंद्रीय तपास यंत्रणांची व्याप्ती सातत्याने वाढते आहे. त्यामुळेच या यंत्रणांनी आता आर्थिक गैरव्यवहार आणि देशविरोधी कारवायांचा समावेश असलेल्या प्रकरणांकडे प्राधान्याने लक्ष द्यायला हवं, असं चंद्रचूड यांनी म्हटलं आहे. स्थापना दिनानिमित्त आयोजित 20 व्या डी.पी. कोहली स्मृती व्याख्यानमालेत सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी आपलं मत व्यक्त केलं. टेक्नोलॉजीत होणाऱ्या सुधारणांमुळे गुन्ह्याच्या पद्धतीच बदलल्या आहेत. त्यामुळे तपास यंत्रणांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो.

- Advertisement -

हेही वाचा – Congress : प्राप्तिकर विभागाकडून काँग्रेसला दिलासा; निवडणुकीपर्यंत कोणतीही कारवाई नाही

सरन्यायाधीश पुढे म्हणाले की, आजच्या काळात CBI ला केवळ भ्रष्टाचारविरोधी तपास एजन्सीच्या रुपातील आपली भूमिका बदलून अन्य प्रकरणातील तपास करण्यासही सांगितले जात आहे. तरीही, सीबीआयने राष्ट्रीय सुरक्षा आणि देशाच्या विरोधात आर्थिक गुन्ह्याच्या संबंधित असलेल्या प्रकरणांवर लक्ष केंद्रित करायला हवे. यामुळेच प्रत्येक प्रकरण सीबीआयकडे सोपवणे योग्य नाही.

- Advertisement -

गुन्हेगारही झाले ऍडव्हान्स

तंत्रज्ञानामुळे गुन्ह्यांचे प्रकार बदलले आहेत याचाही आढावा चंद्रचूड यांनी यावेळी घेतला. आजच्या प्रगत तंत्रज्ञानाच्या युगात गुन्ह्यांची पद्धतही बदलली आहे. तंत्रज्ञानाधारित गुन्ह्यांमध्ये झालेली वाढ तसेच त्याच्या बदललेल्या ट्रेंडमुळे आता यंत्रणांसमोर मोठं आव्हान उभं ठाकलं आहे. तंत्रज्ञानावर आधारित गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळेच या बदललेल्या ट्रेंडने तपास यंत्रणांबरोबरच न्याय यंत्रणांसमोर मोठं आव्हान उभं केलं असल्याचं प्रांजळ मत चंद्रचूड यांनी व्यक्त केलं. सध्याच्या तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर होणाऱ्या युगात एखाद्याची खासगी माहिती चोरीला गेल्यास त्याचा माग काढणं कठीण झालं आहे. तसेच सायबर गुन्ह्यांसाठी ज्या गुंतागुंतीच्या पद्धती गुन्हेगार वापरतात त्यामुळे यंत्रणांना तपासात अडचण निर्माण होते. भ्रष्टाचारविरोधी तपास यंत्रणा या मूळ भूमिकेच्या पलीकडे जाऊन सीबीआयला वेगवेगळ्या प्रकारच्या गुन्हेगारी प्रकरणांचा तपास सोपवला जात आहे. यामुळे सीबीआयने आपल्या भूमिकेवर ठाम रहायला हवे.

हेही वाचा – Aaditya Thackeray: भारतात एप्रिल फूल ‘अच्छे दिन’ म्हणून साजरा होतो; आदित्य ठाकरेंचा मोदी सरकारला टोला

प्रत्येक प्रकरण सीबीआयकडे सोपवणं अयोग्य असल्याचंही सरन्यायाधीशांनी म्हटलं आहे. अलीकडे कोणत्याही प्रकरणात सीबीआयला तपास करायला बोलावले जाते, असे निरीक्षणही चंद्रचूड यांनी नोंदवले आहे. मुळात सीबीआयसारख्या केंद्रीय यंत्रणांनी राष्ट्राविरुद्ध तसेच आर्थिक गुन्ह्यांशी संबंधित प्रकरणांवर अधिक लक्ष देण्याची गरज आहे. भ्रष्टाचारासारख्या प्रकरणांमध्ये प्रामुख्याने कारवाई करण्याची जबाबदारी असलेल्या केंद्रीय यंत्रणेकडे वेगवेगळ्या प्रकरणाची गुन्हेगारी प्रकरणे सोपवली जात असल्याबद्दल चंद्रचूड यांनी नाराजी व्यक्त केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -