Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी लालू प्रसाद यादव यांचा कारगृहातला मुक्काम वाढला, झारखंड कोर्टाने जामीनअर्ज नाकारला

लालू प्रसाद यादव यांचा कारगृहातला मुक्काम वाढला, झारखंड कोर्टाने जामीनअर्ज नाकारला

Subscribe

झारखंड हायकोर्टाने राष्ट्रीय जनता दल (राजद)चे अध्यक्ष लालु प्रसाद यादव यांना पुन्हा एकदा जामीन नाकारला आहे. चारा घोटाळ्यासाठी लालु प्रसाद यादव हे सध्या शिक्षा भोगत आहेत. कोट्यावधी रूपयांचा भ्रष्टाचार झालेल्या घोटाळ्यात न्यायमूर्ती अपरेश कुमार सिंह यांनी लालु प्रसाद यादव यांची याचिका फेटाळून लावली आहे. न्यायालयाने स्पष्ट केले आहे की, या प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना आणखी दोन महिने हे कारागृहातच घालवावे लागणार आहेत. त्यांना न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेपैकी निम्मा कालावधी पुर्ण झाल्यानंतरच त्यांना जामीन देण्यात येईल असे न्यायालयाकडून आज शुक्रवारी झालेल्या सुनावणीत स्पष्ट करण्यात आले. जामीनाचा अर्ज फेटाळतानाच आगामी दोन महिन्यात पुन्हा एकदा नव्याने अर्ज करण्याची सूचना न्यायालयाकडून करण्यात आली आहे.

लालू प्रसाद यादव यांना चारा घोटाळा प्रकरणातील चारपैकी तीन प्रकरणात जामीन जाहीर करण्यात आला आहे. चारा घोटाळ्यात अनधिकृतपणे ३.१३ कोटी रूपये काढल्याबाबतच त्यांना दोषी ठरविण्यात आले आहे. फक्त एका प्रकरणात त्यांना अद्यापही जामीन मान्य करण्यात आलेला नाही. म्हणूनच त्यांचा कारागृहातला मुक्काम वाढला आहे. आता न्यायालयाच्या आदेशानुसारच जामीनासाठी लालू प्रसाद यादव यांना आणखी दोन महिन्यांची प्रतिक्षा करावी लागणार आहे. त्यांना चारा घोटाळ्यात सुनावण्यात आलेल्या शिक्षेपैकी अर्धी शिक्षा पुर्ण होण्यासाठी अद्यापही दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. हा कालावधी येत्या दोन महिन्यात पुर्ण होणार आहे. त्यामुळेच लालू प्रसाद यादव यांचा न्यायालयातील मुक्काम हा आणखी दोन महिन्यांनी वाढणार हे नक्की. दोन महिन्यानंतरच झारखंड कोर्टाकडूनच जामीन अर्जावर निर्णय घेतला जाऊ शकतो. आतापर्यंत काही प्रकरणात वेगवेगळ्या न्यायालयाने लालू प्रसाद यादव यांना जामीन मंजुर केला आहे.


- Advertisement -

 

- Advertisement -
- Advertisement -
Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -