Corona: अमेरिका लस निर्मितीसाठी ‘या’ कंपनीला देणार १२ हजार कोटी!

ऑपरेशन वार्प स्पीड अंतर्गत देण्यात आलेली ही सर्वात मोठी रक्कम

vaccine covid 19

जगभरात कोरोनाचा कहर सुरू असून सर्वच देशातील शास्त्रज्ञ कोरोना लस करण्यात गुंतले आहेत. दरम्यान बायोटेक कंपनी नोव्हावॅक्सद्वारे तयार करण्यात आलेल्या कोव्हिड-१९ वरील लसीच्या विकासासाठी आणि निर्मितीसाठी १.६ बिलियन डॉलर म्हणजे साधारण १२ हजार कोटी रूपयांचा निधी देणार असल्याची घोषणा अमेरिकेकडून करण्यात आली आहे.

आतापर्यंत ऑपरेशन वार्प स्पीड (Operation Warp Speed) अंतर्गत देण्यात आलेली ही सर्वात मोठी रक्कम असल्याचे सांगण्यात येत आहे. या व्यतिरिक्त अमेरिका कोव्हिड-१९ वरील उपचार आणि रोगप्रतिबंधक औषधाच्या प्रयोगासाठी रेजिनरॉनला देखील ४५० अमेरिकन डॉलरचा निधी देणार आहे. आम्ही देशातील लोकसंख्येला महत्त्वपुर्ण सुरक्षा प्रदान करण्यासाठी वेगाने वॅक्सीन तयार करत आहोत, असे कंपनीचे अध्यक्ष आणि सीईओ स्टेनली एर्क यांनी सांगितले.

लसीचे १०० मिलियन डोस तयार

मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेच्या आरोग्य विभाग, संरक्षण विभाग आणि मानवी सेवा यांच्या सोबत झालेल्या कराराच्या अटीनुसार नोव्हावॅक्स या वर्षीच्या अखेरपर्यंत लसीचे १०० मिलियन डोस देण्यास तयार झाले आहे. तर या लसीच्या अंतिम चाचणीला NVX-CoV2373 असे नाव देण्यात आलेले आहे. पुढील काही महिन्यात ही लस उपलब्ध होईल, असेही सांगण्यात येत आहे.

अमेरिकेत २४ तासांत ६० हजारांहून अधिक नवे रूग्ण

जगातील कोरोनाचा विळखा दिवसागणिक वाढत चालला आहे. अमेरिकेतील कोरोना बाधित रूग्णांचा आकडा चिंतेत पाडणारा आहे. गेल्या २४ तासांत केवळ अमेरिकेत ६० हजारांहून अधिक नव्या रूग्णांची नोंद केल्याची माहिती समोर येत आहे. जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या मते, २४ तासांत अमेरिकेत एकूण ६० हजार २०९ नवे रुग्ण वाढले आहेत. या व्यतिरिक्त १ हजार ११४ मृत्यूची नोंद झाली आहे. अमेरिकेत कोरोना विषाणूमुळे मृत्यूची संख्या आता १.३१ लाखांच्या पुढे गेली आहे. तर एकूण संक्रमितांची संख्या जवळपास ३१ लाखांवर आहे.


भारताच्या ‘या’ राज्यात एकही कोरोना रुग्ण नाही!