रोबोकडूनच माणसाचे ऑपरेशन फत्ते ! रोबोटिक्स तंत्रज्ञानाची किमया

For the first time in Britain, a robot performed a human operation
रोबोकडूनच माणसाचे ऑपरेशन फत्ते ! रोबोटिक्स तंत्रज्ञानाची किमया

हल्लीच्या आधुनिक युगात अनेक संशोधनामुळे अशक्य गोष्टी शक्य होत आहेत. मानवाने मानवाच्या सोयीसाठी बनवलेले मानवासारखेच यंत्र म्हणजे रोबोट .या रोबोटच्य साहाय्याने अनेक कामे सोयीस्कर झाली आहेत.मात्र असंच डॉक्टरांचे कामही रोबोट करत असल्याचे हल्ली आपण ऐकत असतो.दरम्यान, ब्रिटनमध्ये पहिल्यांदाच रोबोटने माणसाचे ऑपरेशन केले आहे.

ब्रिटनमधील नसीर नावाच्या माणसाला यावर्षाच्या सुरुवातीला प्रोस्टेट कॅन्सर झाल्याचे समजले.त्यासाठी तो ट्रिटमेंट घेण्यासाठी हॉस्पीटलमध्ये गेला असता,त्याला तेथील डॉक्टरांकडून असे विचारण्यात आले की, “तुम्ही रोबोटिक सिस्टमच्या मदतीने प्रोस्टेट ग्लॅंड काढून टाकणारे ब्रिटनचे पहिले व्यक्ती होऊ इच्छिता का? सेंट थॉमस हॉस्पीटलच्या सर्जन डॉक्टरांनी एक ३ डी कॅमेरा आणि रोबोटिक हाथांच्या मदतीने हे जटिल ऑपरेशन केले. हॉस्पीटलमधील सर्जन डॉक्टर रुग्णापासून काही अंतरावर राहून रोबोटिक हाथांनी हे ऑपरेशन कंट्रोल केले.हे रोबोटिक ऑपरेशन सफल झाले असून, नसीरच्या बाबतीत, सर्वकाही त्याच्या आणि त्याच्या कुटूंबाच्या अपेक्षेनुसार घडले. आता त्यांची कॅन्सरपासून सुटका झाली असून तो आनंदी जीवन जगत आहे.

आता रोबोटही देणार मुलांना जन्म

हल्लीच्या युगात कोणत्याही गोष्टीची शक्यता आपण नाकारु शकत नाही. रोबोट म्हणजे मानवाचे काम हलके करणारे मानवनिर्मित यंत्र.आता हेच यंत्र मुलांनाही जन्म देणार असल्याचे जगभरातील पहिल्या ‘जिवंत रोबोट’ बनवणाऱ्या अमेरिकी शास्त्रज्ञांचे, म्हणणे आहे. ‘जिवंत रोबोट्स’ हे झेनोबॉट्स म्हणून ओळखले जातात. आफ्रिकन बेडकांच्या स्टेम सेलचा वापर करून जगातील पहिला ‘जिवंत,स्व-उपचार करणारा’ रोबोट तयार केला आहे. आता व्हरमाँट युनिव्हर्सिटी, टफ्ट्स युनिव्हर्सिटी आणि हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या वायस इन्स्टिट्यूट फॉर बायोलॉजिकल इन्स्पायर्ड इंजिनीअरिंगमध्ये झेनोबॉट्स विकसित करणाऱ्या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, त्यांनी प्राणी किंवा वनस्पतींपासून जैविक पेशी वेगळ्या केल्या आहेत. त्यानुसार पुनरुत्पादन करणाऱ्या रोबोटचा पूर्णपणे नवीन प्रकार सापडला आहे. हा विज्ञानाचा नवा अविष्कार आहे.


हे ही वाचा – IND vs SA Test Series : रोहितच्या जागी संधी मिळालेल्या प्रियांकने सांगितला कोच द्रविड यांचा सल्ला