घरताज्या घडामोडीइतिहासात प्रथमच भारत जगातील सर्वाधिक सैन्यदलावर खर्च करणारा देश

इतिहासात प्रथमच भारत जगातील सर्वाधिक सैन्यदलावर खर्च करणारा देश

Subscribe

आता सैन्यदलावरील सर्वाधिक खर्च करणाऱ्या देशांच्या यादीत भारत तिसऱ्या क्रमांकावर आला आहे.

जगातील देश आपल्या लष्करी गरजांवर खर्च वाढवित आहेत. भारतानेही यात वाढ केली असून, यामुळे आता सैन्यदलावरील सर्वाधिक खर्च करणाऱ्या देशांच्या यादीत भारत तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. दुसरे म्हणजे चीन, ज्याने अंदाजे २६१ अब्ज डॉलर्स खर्च केले, जे २०१८ मध्ये एकूण खर्चाच्या ५.१ टक्के जास्त होते.

या यादीत पहिल्या स्थानावर अमेरिका आहे, अमेरिकाने अंदाजे ७३२ अब्ज डॉलर्स खर्च केले आहेत. २०१९ मध्ये जगातील लष्करी खर्च १,९०० अब्ज डॉलर्स होते. जगातील देशांनी त्यांच्या सैन्यदलावर २०१९ मध्ये जेवढा खर्च केला. तो मागील दशकभराच्या तुलनेत जास्त आहे. मीडिया रिपोर्ट्स आणि डीडब्ल्यूएच्या वेबसाइटनुसार, जगातील इतिहासात प्रथमच भारत आणि चीन जगातील सर्वाधिक सैन्य खर्चासह पहिल्या तीन देशांच्या यादीत सामील झाले आहेत.

- Advertisement -

लष्करी खर्चाचा हा अहवाल स्टॉकहोम आंतरराष्ट्रीय पीस रिसर्च इन्स्टिट्यूट (एसआयपीआरआय) ने बनविला आहे. अहवालात सर्वाधिक लष्करी खर्च असणार्‍या तीनपैकी दोन देश पहिल्यांदाच आशिया खंडातून आले आहेत. असा अंदाज आहे की, २०१९ मध्ये भारताचा लष्करी खर्च सुमारे ७१ अब्ज डॉलर्स होता. जो २०१८ मध्ये झालेल्या खर्चांपेक्षा ६.८ टक्के जास्त होता. या यादीत भारत तिसर्‍या क्रमांकावर आहे. जो अमेरिकेने २०१८ मध्ये खर्च केल्याच्या तुलनेत ५.३ टक्के अधिक आहे आणि संपूर्ण जगातील ३८.३८ टक्के इतका आहे.

सैन्य दलावर सर्वाधिक खर्च करणाऱ्या ५ देशांमध्ये अमेरिका, चीन आणि भारत नंतर रशिया आणि सौदी अरेबिया यांचा समावेश आहे. या पाच देशांचा लष्करी खर्च हा जगातील खर्चाच्या ६० टक्के इतका आहे. अन्य देशांमध्ये जर्मनीचा समावेश आहे. ज्याने २०१९ मध्ये सैन्य खर्च १० टक्क्यांनी वाढवून ४९.३ अब्ज डॉलर्सवर नेला. सर्वाधिक खर्च असलेल्या १५ देशांमधील ही सर्वात मोठी टक्केवारी वाढ आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -