घरताज्या घडामोडीपहिल्यांदाच 'सीआरपीएफ पासिंग' व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार

पहिल्यांदाच ‘सीआरपीएफ पासिंग’ व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार

Subscribe

देशातील सर्वात मोठी पॅरामिलिट्री फोर्स असलेल्या केंद्रीय राखीव पोलीस बलाच्या (सीआरपीएफ)च्या प्रशिक्षणार्थीचा पासिंग आउट सोहळा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पहिल्यांदाच केला जाणार आहे. यादम्यान प्रत्येक वेळी होणारे परेड किंवा सल्युट देणे या गोष्टी होणार नाही आहेत. शुक्रवारी सीआरपीएफ प्रशिक्षण अकादमी समांरभ कादरूपर येथे होणार आहे. यावेळेस ४२ थेट नेमणूक केलेले शपथ घेणार आहेत.

केंद्रीय गृह राज्यमंत्री जी. किशन रेड्डी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून समारंभाला संबोधित करतील. युट्यूबरवरून हा सोहळा थेट प्रासरित केला जाणार आहे. याची लिंक प्रत्येक प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांनाही शेअर केली जाईल. जेणेकरून तेही या सोहळ्याचा भाग होऊ शकतील.

- Advertisement -

सीआरपीएफच्या मुख्यालयाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, हा सोहळा ३६० आसनस्थान असेलेल्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. सोहळ्याच्या पूर्वी संपूर्ण सभागृह स्वच्छ केले जाणार आहे. प्रशिक्षणार्थी अधिकारी आणि इतर अधिकारी यांच्यात सोशल डिस्टन्सिंग ठेवले जाईल. सीआरपीफचे महासंचालक ए.पी. महेश्वरी अधिकाऱ्यांना शपथ देतील. शेवटी ज्याला ‘पीलिंग ऑफ’ म्हटलं जात ते सभागृहाच्या पायाऱ्यांवर होईल. यासह बेस्ट ट्रेनी म्हणून एका अधिकाऱ्याला पुरस्कार देण्यात येणार आहे.

सर्व प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांची निवड लोक सेवा आयोगच्या परीक्षेच्या माध्यमातून झाली आहे. त्यानंतर सर्वांना ५२ दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. आता यांनासहाय्यक कमांडरच्या पदी विविध युनिटमध्ये तैनात केले जाईल. मागच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात याच्या प्रशिक्षणाला सुरुवात झाली होती. पण कोरोना व्हायरसमुळे पासिंग आउट सोहळा होऊ शकला नाही.

- Advertisement -

हेही वाचा – CoronaVirus: अमेरिकेत मृत्यूचे तांडव; एकाच दिवशी ३ हजार १७६ जणांचा बळी!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -