Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर अर्थजगत श्रीमंतांच्या यादीतून भारतीय गायब, अदानींनंतर अंबानीही आऊट

श्रीमंतांच्या यादीतून भारतीय गायब, अदानींनंतर अंबानीही आऊट

Subscribe

Forbes Billionaires List | हिंडनबर्गचा रिपोर्ट आल्यानंतर अदानी यांचे स्थान घसरत गेले. गौतम अदानी तिसऱ्या स्थानी होते. तिथून ते सातव्या क्रमांकावर घसरले. त्यानंतर टॉप १० च्या यादीतूनच ते बाहेर फेकले गेले

Forbes Billionaires List | नवी दिल्ली – जगभरातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत भारतीय उद्योगपतींचं वर्चस्व होतं. मात्र, गेल्या काही दिवासंपासून या यादीतून भारतीय उद्योगपतींची पिछेहाट होत आहे. गौतम अदानींचे स्थान घसरल्यानंतर आता मुकेश अंबानीसुद्धा टॉप-१०च्या यादीतून बाहेर पडले आहेत. नेट वर्थमध्ये घट झाल्याने भारतीय उद्योजक आणखी खालच्या स्थानावर फेकले गेले आहेत. त्यामुळे टॉपच्या यादीतून भारतीय गायब झाले असून अदानींनंतर अंबानीही आऊट झाले आहेत.  (Forbes Billionaires List: Indian Dominance Decreased In Billionaires List, Know About Adani And Ambani Ranks)

मुकेश अंबानी आणि गौतम अदानी या दोघांच्याही नेटवर्थमध्ये (Net Worth) सोमवारी घट झाली. सोमवारी दुपारी अडीच वाजता मुकेश अंबानी यांच्या नेटवर्थमध्ये ६८.८ डॉलरची घट झाली. तर, गौतम अदानी यांची नेट वर्थ २.७ अरब डॉलरने घटली. गौतम अदानी सध्या श्रीमंत व्यक्तींच्या यादीत १९ व्या नंबरवर आहेत तर, मुकेश अंबानी १२ व्या स्थानी आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – टॉप १० श्रीमंतांच्या यादीत अदानी तिसऱ्या क्रमांकावर, अंबानी कितव्या क्रमांकावर आले? जाणून घ्या

अमेरिकन फर्म हिंडनबर्गचा अहवाल समोर आल्यानंतर अदानी समूहाचे शेअर्स धडाधड कोसळू लागले. हिंडनबर्गने आपल्या अहवालात अदानी समूहावर शेअर बाजारातील हेराफेरी आणि फसवणुकीचा आरोप केला आहे. हिंडनबर्गच्या अहवालावर प्रतिक्रिया देताना गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील अदानी समूहाने हे आरोप बोगस आणि दिशाभूल करणारे असल्याचं म्हटलं आहे. अदानी समूहाचे सीएफओ जुगेशिंदर सिंह यांनी हिंडनबर्ग रिसर्चवर योग्य संशोधन न केल्याचा आणि कॉपी-पेस्ट केल्याचा आरोप केला आहे.

- Advertisement -

हिंडनबर्गचा रिपोर्ट आल्यानंतर अदानी यांचे स्थान घसरत गेले. गौतम अदानी तिसऱ्या स्थानी होते. तिथून ते सातव्या क्रमांकावर घसरले. त्यानंतर टॉप १० च्या यादीतूनच ते बाहेर फेकले गेले. या दरम्यान मुकेश अंबानी टॉप १० च्या यादीत होते. कधी आठव्या तर कधी नवव्या स्थानावर त्यांची पकड होती. मात्र, सोमवारी अदानी थेट १९ व्या स्थानावर गेले तर अंबानी टॉप १० च्या यादीतून बाहेर फेकले गेले.

आता किती संपत्ती?

हिंडनबर्गचा अहवाल येण्याआधी २४ जानेवारी रोजी गौतम अदानींचे नेट वर्थ १२६ अरब डॉलर होती. सहा फेब्रुवारी रोजी संपत्ती घटून ६० अरब डॉलर झाली. गेल्या १२ दिवसांपासून त्यांच्या नेट वर्थमध्ये ६६ अबर डॉलरचे घट झाली आहे.

टॉप टेनमध्ये कोण?

  1. बर्नार्ड अरनॉल्ट – २१९.१ बिलिअन डॉलर
  2. एलन मस्क – १८४.२ बिलिअन डॉलर
  3. जेफ बेजोस – १२६ बिलिअन डॉलर
  4. लैरी एलिसन ११४ बिलिअन डॉलर
  5. वॉरेन बफे – १०७.१ बिलिअन डॉलर
  6. बिल गेट्स १०५.१ बिलिअन डॉलर
  7. लैरी पेज ९०.२ बिलिअन डॉलर
  8. कार्लोस स्लिम हेलु ८९.८ बिलिअन डॉलर
  9. सर्गेई ब्रिन ८९.८ बिलिअन डॉलर
  10. स्टीव बॉल्मर ८३.२ बिलिअन डॉलर
- Advertisment -