घरदेश-विदेशदेशात सलग १४ वर्षे मुकेश अंबानी टॉपर, संपत्ती ५० टक्क्यांनी वाढली

देशात सलग १४ वर्षे मुकेश अंबानी टॉपर, संपत्ती ५० टक्क्यांनी वाढली

Subscribe

Forbes ने देशातील यंदाचे सर्वात श्रीमंत १०० व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. या यादीत देशात सलग १४ वर्षे मुकेश अंबानी (Mukesh Ambani) टॉपवर आहेत. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर अदानी उद्योग समूहाचे प्रमुख गौतम अदानी आहेत. एकीकडे कोरोनामुळे देशातील आर्थिक स्थिती कोलमडली आहे. तर गरीबांना दोन वेळचे जेवणही मिळणे अवघड झाले असताना दुसरीकडे मात्र देशातील उद्योगपतींच्या तिजोरीत दिवसेंदिवस भर पडतेय. या उद्योगपत्तींच्या संपत्ती थोडी थोडकी नाही तर तब्बल ५० टक्क्यांनी वाढली आहे. (Forbes List of India’s 100 Richest)

फोर्ब्सने भारतातील १०० श्रीमंतांची यादी जाहीर केली असून ७७५ डॉलर्सची नोंद केली आहे. या यादीत सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या यादीत पहिल्या क्रमांकावर मुकेश अंबानी आहेत. यात अंबानींनी २००८ पासून सलग १४ वर्षे आपला पहिला क्रमांक कायम ठेवला आहे. त्यामुळे मागील १४ वर्षांपासून मुकेश अंबानी हे भारतातील सर्वात टॉपचे श्रीमंत व्यक्ती आहे. त्यांची संपत्ती ९२.७ अब्ज डॉलर्सवर पोहचली आहे. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर अदानी उद्योग समूहाचे प्रमुख गौतम अदानी असून त्यांची संपत्ती ही ७४.८ अब्ज डॉलर्स झाली आहे. त्यामुळे अदानींच्या संपत्तीतही तीन पटीने वाढ झाली आहे.

- Advertisement -

याशिवाय HCL टेक्नोलॉजीचे संस्थापक शिव नाडर तिसऱ्या क्रमांकावर आहेत. ज्यांनी तंत्रज्ञान क्षेत्रातून तब्बल १०.६ अब्ज डॉलर्सची संपत्ती कमावली आहे. त्यामुळे ३१ अब्ज डॉलर्ससह ते भारतातील तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत.

यानंतर देशातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात व्यक्ती म्हणून राधाकिशन दमानी यांचे नाव आहे. त्यांची संपत्ती १५.५ अब्ज डॉलर्सवरुन २९.४ अब्ज डॉलर्सवर पोहचली आहे.

- Advertisement -

विशेष म्हणजे सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संस्थापक सायरस पुनावाला हे देखील १९ अब्ज डॉलर्स संपत्तीसह पहिल्या पाच श्रीमंत भारतीयांच्या यादीत पोहचले आहेत. यावर्षी फोर्ब्सच्या सर्वात श्रीमंत भारतीयांच्या यादीत सहा नवीन नावांची भर पडली आहे. तर ६१ जणांच्या संपत्ती एक अब्ज डॉलर्सहून अधिकची भर पडली आहे. यात गेल्या वर्षभरात भारतातील टॉप शंभर उद्योगपतींची संपत्ती तब्बल २५७ अब्ज डॉलर्सनी वाढली असून ती ७७५ अब्ज डॉलर्सवर पोहचली आहे. तर यंदा यादीतील ८० हून अधिक अब्जाधीश उद्योगपतींच्या संपत्तीत मोठी भर पडली आहे.

१) मुकेश अंबानी – ९२.७ अब्ज डॉलर्स

२) गौतम अदानी –  ७४.८ अब्ज डॉलर्स

३) शिव नडार – ३१ अब्ज डॉलर्स

४) राधाकृष्ण दमानी – २९.४ अब्ज डॉलर्स

५) सायरस पुनावाला – १९ अब्ज डॉलर्स

६) लक्ष्मी मित्तल – १८.८ अब्ज डॉलर्स

७) सावित्री जिंदाल – १८ अब्ज डॉलर्स

८) उदय कोटक – १६.५  अब्ज डॉलर्स

९) पालनजी मिस्त्री – १६.४ अब्ज डॉलर्स

१०) कुमार बिर्ला – १५.८ अब्ज डॉलर्स


Say No To Drugs : आर्यनच्या अटकेनंतर बॉलिवूडमधील ३१ वर्षांपूर्वींच्या मोहिमेला संजीवनी


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -