घरदेश-विदेशभयंकर! भर पार्कात अल्पवयीन मुलीवर ओरल सेक्सची जबरदस्ती

भयंकर! भर पार्कात अल्पवयीन मुलीवर ओरल सेक्सची जबरदस्ती

Subscribe

दिल्लीत माणूसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. दिल्लीत भर दुपारी एका १२ वर्षाच्या मुलीवर ओरल सेक्सची जबरदस्ती करणाऱ्या एका ४२ वर्षीय व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. दिल्लीच्या राजौरी गार्डन परिसरात असलेल्या पार्कमध्ये शनिवारी ही घटना घडली. नीरज कोल्ही असे आरोपीचे नाव असून तो ताग उत्पादनाच्या कारखान्याचा मालक आहे.

अल्पवयीन पीडित मुलगी आणि तिचा ८ वर्षांचा भाऊ शनिवारी दुपारी राजौरी गार्डन येथील बसस्थानकावर डिलिव्हरी एजंटची वाट पहात होते. यावेळी पार्कमध्ये अंमली पदार्थांचे सेवन करत असलेला आरोपी नीरज कोल्हीने पीडित मुलीच्या भावाला पार्कच्या आत खेचण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याने पीडित मुलीला भावासोबत आत यायला सांगितले, अन्यथा तिच्या भावाचा लैंगिक छळ करेल अशी धमकी दिली. त्यामुळे पीडित मुलगी त्याच्याबरोबर पार्कमध्ये गेली. आरोपीने पीडित मुलीला जबरदस्तीने ओरल सेक्सची सक्ती केली. पीडित मुलीला कपडे काढायला सांगितले. जेव्हा मुलीने आपले कपडे काढले तेव्हा आरोपीने तिचे नग्न फोटो काढले.

- Advertisement -

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार हे दोन्ही भावंडे या प्रकरणानंतर त्यांच्या आईकडे गेले आणि त्यांनी सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर अल्पवयीन पीडित मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर पोलिसांनी आरोपी कोल्ही याला पार्कमधून अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या भागात ही घटना घडली त्याच ठिकाणी मुलांचे वडील दुकान चालवतात. त्याचे कुटुंब दुसर्‍या भागात राहते. या घटनेनंतर पीडित मुलगी मानसिकरित्या अस्वस्थ असून तिचे समुपदेशन केले जात आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -