नवी दिल्ली : अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे 20 जानेवारी रोजी दुसऱ्यांदा राष्ट्रपतीपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्या शपथविधी समारंभात सहभागी होण्यासाठी जगभरातून अनेक नेते येणार आहेत. या शपथविधी सोहोळ्याचे आमंत्रण भारताला देखील असून, यासाठी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर हे देशाचे प्रतिनिधित्व करतील. (foreign minister dr s jaishankar will attend donald trump swearing in ceremony)
या शपथविधी सोहोळ्याला उपस्थित राहण्यासाठी ट्रम्प – वॅन्स उद्घाटन समितीने भारत सरकारला आमंत्रण दिले आहे. या कार्यक्रमासाठी भारत सरकारकडून डॉ. जयशंकर हे उपस्थित राहणार आहेत. रविवारी परराष्ट्र मंत्रालयाने याची माहिती दिली. आपल्या या दौऱ्यादरम्यान परराष्ट्र मंत्री डॉ. जयशंकर हे ट्रम्प प्रशासनातील काही अधिकाऱ्यांशी देखील भेटीगाठी करतील. यासंदर्भातील एक प्रसिद्धी पत्रक भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने रविवारी जारी केले.
हेही वाचा – Working Hours : भारतीय नेमके किती तास काम करतात…
आपल्या या दौऱ्यादरम्यान, जयशंकर या शपथविधीसाठी आलेल्या अन्य महत्त्वाच्या नेत्यांची देखील भेट घेतील.
On the invitation of the Trump-Vance Inaugural Committee, External Affairs Minister, Dr. S. Jaishankar will represent the Government of India at the Swearing-in Ceremony of the President-Elect Donald J. Trump as the 47th President of the United States of America.
Press Release :…
— Randhir Jaiswal (@MEAIndia) January 12, 2025
डोनाल्ड ट्रम्प हे 20 जानेवारीला दुसऱ्यांदा अमेरिकेच्या राष्ट्रपती पदाची शपथ घेतील. ते अमेरिकेचे 47 वे राष्ट्रपती असतील. यावेळच्या त्यांच्या सरकारमध्ये भारतीय वंशाचे अनेकजण आहेत. ट्रम्प यांचा शपथविधी सोहोळा 20 जानेवारीला दुपारी 12 वाजता सुरू होईल. यात शपथविधी, संचलन तसेच अन्य कार्यक्रमांचा समावेश असेल.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहोळ्यासाठी चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग, इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू तसेच अर्जेंटिनाचे राष्ट्रपती झेवियर मिलेई सहभागी होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा – Devendra Fadnavis : राजा होणं म्हणजे…चाणक्यांची आठवण काढत काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस