नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आणि सगळेच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. अनेकांचे पक्षप्रवेश सुरू आहेत. माजी हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल आरकेएस भदौरिया यांनी रविवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भदौरिया यांनी रविवारी २४ मार्चला पक्षाचे सरचिटणीस विनोद तावडे आणि केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.
#WATCH | Former Chief of Air Staff, Air Chief Marshal (Retd.) RKS Bhadauria joins BJP in the presence of party General Secretary Vinod Tawde and Union Minister Anurag Thakur. pic.twitter.com/n3s9k7INmf
— ANI (@ANI) March 24, 2024
कोण आहेत आरकेएस भदौरिया?
आरकेएस भदौरिया हे उत्तर प्रदेशातील आग्रा जिल्ह्यातील बह तहसील येथील निवासी आहेत. राफेल विमान भारताला मिळवून देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. या विमानांसाठी फ्रान्सशी वाटाघाटी करणाऱ्या संघाचे त्यांनी नेतृत्व केले होते. सप्टेंबर 2021 मध्ये आरकेएस भदौरिया हवाई दल प्रमुख पदावरून निवृत्त झाले. भदौरिया 30 सप्टेंबर 2019 ते 30 सप्टेंबर 2021 पर्यंत देशाचे हवाई दल प्रमुख होते. त्यांच्या जागी एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी यांची हवाई दल प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली.
हेही वाचा – Vijay Shivtare : उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख ठरली, वेळही ठरली; शिवतारेंनी लोकसभेचे रणशिंग फुंकले
भाजपा तिकीट देणार का?
उत्तर प्रदेशातील गाझियाबाद लोकसभा मतदारसंघातून भाजप माजी हवाई दल प्रमुख आरकेएस भदौरिया यांना तिकीट देऊ शकते. जनरल व्हीके सिंग हे सध्या येथील भाजपाचेच खासदार आहेत. 2014 आणि 2019 मध्ये ते येथून निवडून आले आहेत. भाजपने आतापर्यंत जाहीर केलेल्या उमेदवारांच्या चार यादीत गाझियाबादमधील उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही. त्यातच भदौरिया यांनी पक्ष प्रवेश केल्याने येथून आरकेएस भदौरिया यांना उमेदवारी दिली जाण्याचा अंदाज आहे.
हेही वाचा – Somalian Pirates : भारतीय नौदलाने जेरबंद केलेले 35 सोमालियन चाचे मुंबई पोलिसांच्या ताब्यात