घरदेश-विदेश'जवानांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेणार' - माजी लष्कर प्रमुख

‘जवानांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेणार’ – माजी लष्कर प्रमुख

Subscribe

पुलवामा येथील भ्याड हल्लाचा माझी लष्कर प्रमुख वीके सिंग यांनी निषेध केला आहे. त्यांनी या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. 'जवानांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेणार', असा इशारा त्यांनी दिला आहे.

आज जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात मोठा दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात ३० जवान शहीद झाले आहेत, तर ४५ पेक्षा जास्त जवान जखमी झाले आहेत. या हल्ल्यावर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, भारतीय लष्कराचे माजी लष्कर प्रमुख आणि केंद्रिय परराष्ट्र राज्यमंत्री वीके सिंग यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. ‘जवानांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेणार’, असा इशारा सिंग यांनी दिला आहे.

नेमकं काय म्हणाले वीके सिंग?

‘एक सैनिक आणि भारतीय म्हणून माझं रक्त सळसळतं आहे. सीआरपीएफच्या १८ शूरविरांना बलिदान दिलं आहे. मी त्यांच्या निःस्वार्थ बलिदानाला नमस्कार करतो आणि आमच्या सैनिकांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबवर सूड घेण्याचा वचन देतो’, असे वीके सिंग म्हणाले आहेत.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -