घरदेश-विदेशभारताचे माजी अ‍ॅटर्नी जनरल सोली सोराबजी यांचं निधन

भारताचे माजी अ‍ॅटर्नी जनरल सोली सोराबजी यांचं निधन

Subscribe

भारताचे माजी अ‍ॅटर्नी जनरल सोली सोराबजी यांचं निधन झालं आहे. वयाच्या ९१ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सोली सोराबजी यांनी काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झालू होती. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दक्षिण दिल्लीमधील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. १९८९ ते ९० आणि त्यानंतर १९९८ ते २००४ या काळात ते देशाचे अ‍ॅटर्नी जनरल होते.

सोली सोराबजी यांचा जन्म १९३० मध्ये मुंबई येथे झाला. ते १९५३ पासून मुंबई उच्च न्यायालयात सराव करीत होते. १९७१ मध्ये सोली सोराबजी सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील झाले. ते दोन वेळा भारताचे अ‍ॅटर्नी जनरल होते. ते १९८९ ते ९० दरम्यानच्या काळात अ‍ॅटर्नी जनरल म्हणून काम पाहिलं. दुसऱ्यांदा १९९८ ते २००४ पर्यंत पुन्हा एकदा अ‍ॅटर्नी जनरल बनले.

- Advertisement -

सोली सोराबजी देशातील सर्वात मोठे मानवाधिकार वकील म्हणून ओळख होती. १९९७ मध्ये, संयुक्त राष्ट्रांनी त्यांना नायजेरियात विशेष दूत म्हणून पाठवलं होतं. कारण तेथील मानवी हक्कांच्या परिस्थितीबद्दल माहिती समजावी. त्यानंतर १९९८ ते २००४ पर्यंत ते मानवाधिकार संवर्धन व संरक्षण या विषयावर UN-Sub Commission चे सदस्य आणि नंतर अध्यक्ष झाले.

शरद पवारांनी व्यक्त केलं दु:ख

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोली सोराबजी यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. माजी अ‍ॅटर्नी जनरल पद्म विभूषण सोली सोराजी यांच्या निधनाबद्दल ऐकून दु: ख झालं. ज्येष्ठ अधिवक्ता म्हणून त्यांची दीर्घ कारकीर्द हे भारतीय राज्यघटनेच्या सार्वभौमत्वाबद्दल आणि प्रतिबद्धतेशी बांधिलकीचं उदाहरण आहे, असं शरद पवार म्हणाले.

- Advertisement -

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -