घरदेश-विदेशऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान टोनी एबॉट करणार भारताचा दौरा

ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान टोनी एबॉट करणार भारताचा दौरा

Subscribe

कॉम्प्रिहेन्सिव्ह स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप अर्थात सीएसपी अंतर्गत आर्थिक आणि व्यापारी संबंध दृढ करण्यासाठी ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान टोनी एबॉट या महिन्यात भारताच्या दौऱ्यावर असणार आहेत. यावेळी विविध मंत्री आणि व्यावसायिक नेत्यांना ते भेट देण्याची शक्यता आहे. टोनी एबॉट हे ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच भारत दौरा करणार असल्याचे सांगितले जात आहे. तर टोनी एबॉट हे दोन्ही देशांमधील आर्थिक आणि व्यापार संबंध सुधारण्यासाठी आणि ते अधिक वृद्धिंगत करण्यासाठी भारताच्या दौऱ्यावर येत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, एबॉट यांना भारत दौऱ्यावर पाठवण्यासाठी स्कॉट मॉरिसन सरकार साधारण १९ हजार डॉलर खर्च करणार आहेत. यापूर्वी ऑस्ट्रेलियन व्यापार मंत्री डॅन तेहान यांनी असे सांगितले होते की, ऑस्ट्रेलियन माजी पंतप्रधान टोनी एबॉट व्यापक धोरणात्मक भागीदारी म्हणून महत्त्वाचे आर्थिक आणि व्यापारी संबंध पुढे नेण्यासाठी ऑगस्टच्या सुरुवातीला भारत दौऱ्यावर असतील. यासह परराष्ट्र व्यवहार आणि व्यापार विभागाच्या प्रवक्त्याने (Dfat) या प्रवासाबद्दल अधिक माहिती देताना सांगितले की, एबॉट कमर्शिल विमानातून पाच दिवसांचा भारत दौऱ्यावर असतील. तसेच, ऑस्ट्रेलियन सरकार एबॉट यांच्या भारत दौऱ्यासाठी साधारण १९ हजार डॉलर्सच्या रकमेसाठी पाठिंबा देत असल्याचे एका प्रवक्त्याने गार्डियन ऑस्ट्रेलियाला सांगितले.

- Advertisement -

२०१५ मध्ये माल्कम टर्नबुल यांनी मुख्य पदावरून हकालपट्टी करण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी कार्यरत संबंध विकसित केले होते. परंतु ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात व्यापार करारावर वाटाघाटी करण्यासंदर्भात एबॉट यांच्या भूतकाळातील आशा असूनही, ते कधीही शक्य झाले नाही. याआधी, पंतप्रधान मोदी आणि त्यांचे ऑस्ट्रेलियन स्कॉट मॉरिसन यांच्यातील व्हर्च्युअल परिषदेदरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलियाने संरक्षण आणि इतर कामांसह सात करारांवर स्वाक्षरी केली होती. दरम्यान, दोन्ही देशांनी सैन्य सराव आणि गुंतवणूकीच्या व्यवहारांची व्याप्ती वाढवून संरक्षणाच्या हेतूने सहकार्य वाढवण्याचा निर्णय घेतला होता, जेणेकरून सुरक्षा समस्यांचे निराकरण करण्यासाठी नवीन मार्ग तयार केले जाण्याची शक्यता निर्माण होऊ शकेल.


Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -