बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांची प्रकृती खालावली; एम्स रुग्णालयात केले दाखल

former bihar chief minister lalu prasad yadav admitted to aiims hospital in delhi

राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख आणि बिहारचे माजी मुख्यंत्री लालू प्रसाद यादव यांची प्रकृती पुन्हा खालावली आहे. त्यांच्या खांद्याला आणि पायाला दुखापत झाल्याने त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल केले आहे. लालू प्रसाद यादव पाटणा येथील घरात पायऱ्या चढताना कोसळले. यात त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. यावेळी तात्काळ उपचारांसाठी लालू प्रसाद यादव यांना पाटण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र प्रकृतीत कोणतीही सुधारणा न झाल्याने एअर अॅम्ब्युलन्सने त्यांना पाटण्याहून दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले.

आज सकाळपर्यंत लालूप्रसाद यादव यांच्या शरीरात कोणतीही हालचाल आढळून न आल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. वयाबरोबर वाढत्या आजारांमुळे दिल्लीच्या एम्समधील डॉक्टरांनी लालूप्रसाद यादव यांच्या सर्व चाचण्या केल्या आहेत. तर लालू प्रसाद यादव यांच्या समर्थकांकडूनही ते लवकरं बरे होण्यासाठी पूजापाठ करत आहेत. दरम्यान पाटण्याच्या अनेक मंदिरांमध्येही होम हवन केले जात आहे. लालू प्रसाद यादव यांना किडनी प्रत्यारोपणासाठी सिंगापूरला नेण्यात येणार होते. मात्र दुखापतीमुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढचे उपचार केले जात आहे.

दिल्लीच्या एम्स रुग्णालयातील डॉक्टरांकडून याआधीही लालू प्रसाद यादव यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यामुळे पाटण्याहून दिल्लीत आणण्यात आले आहेत. लालू प्रसाद यादव यांच्या शरीरावर तीन ठिकाणी गंभीर दुखापत झाली आहे. लालू प्रसाद यादव यांची प्रकृती खालवण्यामागे औषधांचा ओव्हरडोज असल्याचे सांगितले जात आहे.


आमदार निवासातील खोलीचं छत कोसळलं; एकदम ok म्हणणारे आमदार पाटील थोडक्यात बचावले