घरदेश-विदेशमाजी सीईओ जॅक डोर्सी देणार Twitter ला टक्कर, आणलं 'Bluesky App'

माजी सीईओ जॅक डोर्सी देणार Twitter ला टक्कर, आणलं ‘Bluesky App’

Subscribe

मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरचे माजी सीईओ जॅक डोर्सी यांनी एक नवीन अॅप्लिकेशन लॉन्च केले आहे.

मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरचे माजी सीईओ जॅक डोर्सी यांनी एक नवीन अ‍ॅप्लिकेशन लॉन्च केले आहे. BlueSky नावाचे हे अ‍ॅप ट्विटरसारखेच आहे. त्याचा इंटरफेस मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटर सारखाच आहे. ट्विटरवर ज्या पद्धतीने लोक ट्विट करू शकतात, लोकांना फॉलो करू शकतात, त्याच पद्धतीने हे अ‍ॅपही काम करते. Twitter हे अ‍ॅप तुम्हाला “What’s up?” असं विचारतो. सध्या अ‍ॅप विकसित करण्याच्या टप्प्यात आहे, कंपनी आगामी काळात आणखी सुधारणा करणार आहे.

आत्तापर्यंत हे अ‍ॅप अद्याप चाचणीच्या टप्प्यात आहे. मात्र, ते अ‍ॅपल स्टोअरवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. अशा परिस्थितीत लवकरच सर्व युजर्स हे अ‍ॅप वापरू शकतील अशी अपेक्षा आहे.

- Advertisement -

ब्लूस्की अ‍ॅप १७ फेब्रुवारी रोजी सादर करण्यात आले. २००० हून अधिक युजर्सनी चाचणीसाठी ते स्थापित केलं आहे. सर्व सुधारणा आणि त्रुटी सुनिश्चित केल्यानंतर अ‍ॅप सर्व युजर्ससाठी लाइव्ह केलं जाईल.

याशिवाय हे अ‍ॅप स्टोअरवरही रिलीज करण्यात आले आहे. लवकरच हे अ‍ॅप लोकांसाठी आणले जाईल, असा विश्वास आहे. काही काळासाठी केवळ इन्वाइट-ओनली द्वारेच प्रवेश करता येऊ शकतो.

- Advertisement -

जॅक डोर्सी यांनी नोव्हेंबर २०२१ मध्ये ट्विटरच्या सीईओ पदाचा राजीनामा दिला होता. ट्विटरला उंचावर नेणारी व्यक्ती जॅक मानली जाते. अशा परिस्थितीत आता ब्लू स्काय लॉन्च करून ते ट्विटरला कडवे आव्हान देऊ शकतात. ट्विटर विकत घेतल्यानंतर एलोन मस्कने त्यासाठी सशुल्क पडताळणी सेवा जाहीर केली. लोकांना आता ट्विटरवर ब्लू टिक्ससाठी पैसे द्यावे लागतील. कंपनी केवळ ब्लू टिकसाठीच नाही तर अनेक सेवांसाठी हे शुल्क घेते.

अलीकडे ट्विटरने सामान्य युजर्ससाठी टेक्स्ट बेस्ड ऑथेंटिकेशन सिस्टम देखील समाप्त केली आहे. म्हणजेच, आता फक्त ट्विटर ब्लू वापरणारे लोक या पद्धतीद्वारे स्वतःचे वॅलिडेटेशन करू शकतात. कारण ब्लू स्काय विनामूल्य आहे आणि जॅक डोर्सी हे लॉन्च करत आहेत, यामुळे ते प्रसिद्धी मिळवू शकतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -