मुंबई : आंध्र प्रदेशाचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना अटक करण्यात आली आहे. चंद्राबाबू नायडू यांना स्किल डेव्हलपमेंट कॉपोरेशन घोटाळ्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. सीआयडीकडून भ्रष्टाचाराप्रकरणी ही अटकेची कारवाई केली आहे आली आहे. चंद्राबाबू नायडू यांच्या मुगला नारा लोकेश याला सुद्धा अटक करण्यात आली आहे.
Andhra Pradesh | Criminal Investigation Department (CID) arrest TDP chief and former Andhra Pradesh CM N Chandrababu Naidu in Nandyala: TDP
(File Pic) pic.twitter.com/m6cWcONAVa
— ANI (@ANI) September 9, 2023
चंद्राबाबू नायडू हे आंध्र प्रदेशाच्या नांदयाल शहरात आरके फंक्शन हॉलमध्ये असलेल्या कॅम्पमध्ये विश्रांती घेत असताना आज पाहाटे 3 वाजता नांदयाल येथून सीआयडीने अटक केले. चंद्राबाबू नायडू यांच्यावर 2021 मध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली एफआयआर दाखल करण्यात आली होती. चंद्राबाबू नायडू यांच्यावर सीआरपीसीच्या कलम 50 (1) (2) अंतर्गत अटक करण्यात आले आहे.
नेमका काय आहे घोटाळा
चंद्रबाबू नायडू हे आंध्रप्रदेशाचे मुख्यमंत्री असताना स्किल डेव्हलपमेंट योजना आणण्यात आली होती. या योजनेनुसार कौशल विकास प्रशिक्षण अंतर्गत तरुणांना नोकरीसाठी तयार करण्यात येत होते. चंद्रबाबू नायडूच्या सरकारने Siemens या कंपनीने जबाबदारी दिली होती. यात क्लस्टर्स तयार करण्यात आले होते. यासाठी एकूण 3300 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. यात प्रत्येक क्लस्टरवर 560 कोटी रुपये खर्च करण्यात आला होता. यात एकूण 10 टक्के 370 कोटी रुपये करण्यात आले होते. 90 टक्के खर्च हा कौशल विकास प्रशिक्षण देणारी कंपनीला करणार होते. पण सरकारने 371 कोटी रुपये कंपनीला ट्रान्सफर केले.