Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश प्रकाशसिंग बादल यांच्या निधनानंतर दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर

प्रकाशसिंग बादल यांच्या निधनानंतर दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर

Subscribe

मुंबई | पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे ज्येष्ठ नेते प्रकाशसिंग बादल (Prakashsinh Badal) यांचे निधन झाले आहे. प्रकाशसिंग बादल यांच्यावर मोहाली येथील फोर्टिस रुग्णालयात उपचार सुरू होते. प्रकाशसिंग बादल यांनी वयाच्या ९५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या आठवडाभरापूर्वी प्रकाशसिंग बादल यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. प्रकाश सिंग बादल यांचे मंगळवारी निधन झाले. यानंतर केंद्र सरकारने दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. तसेच देशाचे राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोकसंदेश व्यक्त केला आहे.

 

- Advertisement -

गेल्या वर्षी प्रकाशसिंग बादल यांना कोरोना विषाणूची लागण झाली होती. यावेळी प्रकाशसिंग बादल यांच्यावर लुधियाना येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यातून प्रकाशसिंग बादल हे बरे देखील झाले होते. परंतु, दीर्घ आजाराने प्रकाशसिंग बादल यांचे मंगळवारी रात्री निधन झाले. प्रकाश सिंग बादल यांच्या पार्थिवावर भटिंडा येथील बादल गावात त्यांच्या अंत्यसंस्कार होणार आहे.

प्रकाशशिंग बादल यांचा अल्प परिचय

- Advertisement -

प्रकाशसिंग बादल यांचा जन्म ८ डिसेंबर  १९२७ रोजी पंजाबच्या मलोतजवळील अबुल खुराना या छोट्याशा गावात एका जाट शिख कुटुंबात झाला. १९४७ मध्ये त्यांनी राजकारणात पदार्पण केले. १९५७ मध्ये पहिली विधानसभा निवडणूक लढवली. १९६९ध्ये त्यांनी पुन्हा विजय मिळवला. १९६९-७० मध्ये ते पंचायत राज, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय इत्यादी खात्यांचे मंत्री होते. प्रकाशसिंग बादल हे पाच वेळा पंजाबचे मुख्यमंत्रीपद भूषविले होते. १९७० ते १९७१ आणि पुन्हा १९७७ ते १९८०  या कालावधीत ते राज्याचे मुख्यमंत्री होते. यानंतर ते १९९७ ते २००२ आणि २००७  ते २०१७ यादरम्यान ते पुन्हा पंजाब राज्याचे मुख्यमंत्री होते. याशिवाय १९७२, १९८०  आणि २००२ मध्ये ते विरोधी पक्षनेतेही होते. एवढेच नाही तर, मोरारजी देसाई पंतप्रधान असताना त्यांनी केंद्रीय कृषिमंत्री म्हणूनही काम पाहिले होते. प्रकाशसिंग बादल यांना ३० मार्च २०१५  रोजी पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

- Advertisment -