Friday, June 9, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी माझी स्तुती करणं म्हणजे.., गेहलोत यांच्या 'त्या' दाव्यावर माजी मुख्यमंत्र्यांचा पलटवार

माझी स्तुती करणं म्हणजे.., गेहलोत यांच्या ‘त्या’ दाव्यावर माजी मुख्यमंत्र्यांचा पलटवार

Subscribe

तीन वर्षांपूर्वी स्वपक्षीय आमदारांनी केलेल्या बंडाच्या वेळी माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि इतर दोन भाजपा आमदारांनी केलेल्या मदतीमुळे माझे सरकार वाचवता आले, असा दावा राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी काल (रविवार) केला होता. त्यावर भाजपच्या विरोधी पक्षनेत्या आणि माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी गेहलोत यांच्यावर पलटवार केला आहे. माझी स्तुती करणं म्हणजे माझ्याविरुद्ध षडयंत्र असल्याचं वसुंधरा राजे यांनी म्हटलं आहे.

गेहलोत यांनी माझ्याविरोधात रचलेलं एक मोठं षडयंत्र आहे. माझा जितका अपमान गेहलोत यांनी केला आहे, तितका माझा अपमान कोणीच करू शकत नाही. 2023 मध्ये आगामी निवडणुका पार पडणार आहेत. परंतु या निवडणुकीत होणाऱ्या पराभवामुळे त्यांना भीती वाटू लागली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी माझी प्रशंसा करणं म्हणजे हे माझ्याविरुद्धचे मोठे षडयंत्र आहे, असं वसुंधरा राजे म्हणाल्या.

- Advertisement -

काय म्हणाले होते मुख्यमंत्री?

धोलपूरमधील एका कार्यक्रमात गेहलोत म्हणाले होते की, माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे, माजी विधानसभा अध्यक्ष कैलास मेघवाल आणि माजी आमदार शोभाराणी कुशवाह या तीन भाजपा नेत्यांच्या पाठिंब्यामुळेच त्यांचे सरकार वाचू शकले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, गजेंद्रसिंह शेखावत आणि धर्मेंद्र प्रधान यांनी मिळून माझे सरकार पाडण्याचा कट रचला होता. त्यांनी त्यासाठी बंडखोरांना राजस्थानमध्ये पैसे वाटले आणि आता हे पैसे परत घेत नाहीत. मला आश्चर्य वाटते की, बंडखोर आमदारांकडून पैसे का परत मागत नाहीत. आमदारांनी पैस परत नाही केले तर त्यांच्यावर अमित शाह यांचा दबाव राहील, असा दावा गेहलोत यांनी केला होता.

- Advertisement -

पक्षाने गेहलोत यांना तिसऱ्यांदा मुख्यमंत्री बनवले आहे. या वर्षाच्या अखेर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सर्वांना सोबत घेऊन भूतकाळातील घडामोडी विसरून पक्षाला पुन्हा सत्तारुढ करणं हेच माझे कर्तव्य आहे, असंही गेहलोत म्हणाले.


हेही वाचा : नितीश कुमार बांधणार विरोधकांची मोट, मुंबई दौऱ्यात ठाकरेंसह घेणार पवारांची भेट


 

- Advertisment -