घरदेश-विदेशगुप्तमाहिती पसरवल्या प्रकरणी माजी वायूसेना कर्मचाऱ्याला अटक

गुप्तमाहिती पसरवल्या प्रकरणी माजी वायूसेना कर्मचाऱ्याला अटक

Subscribe

भारतीय वायू सेनेच्या लढाऊ विमानाचे वेळापत्रक संबधी व्यवहार करण्याच्या आरोपाअंतर्गत अटक.

भारतीय वायू सेनेत काम करणाऱ्या एका माजी कर्मचाऱ्यावर गुप्तमाहिती पसवण्याचा आरोप करण्यात आला आहे. या आरोप अंतर्गत नुकतीच त्याला अटक करण्यात आली आहे. शशिकांत झा असे कर्मचाऱ्याचे नाव असून तो बिहार येथील बांका जिल्हाचा रहिवाशी आहे. भारतीय वायू दलाने ५ जूलै रोजी ‘शशिकांत’ला अटक केली होती. यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. विमाने उडण्याचा वेळापत्रक अशा भारतीय वायूसेनेमधील गुप्त माहिती प्रसरवल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांबरोबरच दहशतवाद विरोधी पथकही या प्रकरणात चौकशी करत आहेत.

“भारतीय वायू सेनेने ५ जूलै रोजी शशिकांतला गुप्तमाहिती पसवण्याच्या आरोपाअंतर्गत दोषी ठरवण्यात आले होते. वायूसेनेची गुप्तमाहितीचे कागदपत्रांचा व्यवहार करताना त्याला पकडले गेले होते.”- प्रवीण कुमार, गोरखपूर पोलीस गुन्हे अधिकारी

- Advertisement -

या प्रकरणात पोलिसांनी शशिकांत कडून काही कागदपत्र हस्तगत केले आहेत. यामध्ये वायूसेनेचे महत्वाचे नकाशे आणि लढाऊ विमानांसबधीत महत्वाचे कागदपत्रही सामिल आहेत. शशिकांत वायू सेनेच्या मेसमध्ये आचारी म्हणून कार्यरत असल्याची माहिती पोलीस तपासादरम्यान समोर आली आहे. यापूर्वी तो भारतीय वायूसेनेतील एका अधिकाऱ्याचा वाहन चालक म्हणून कार्यरत होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -