घरदेश-विदेशमाजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचे निधन

माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचे निधन

Subscribe

माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचे वयाच्या ८८ वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या निधनाची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली. त्यांच्या निधनाने देशातील कामगारांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचे वयाच्या ८८ वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या निधनाची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे. मागील अनेक महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. दिल्ला मध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ऑगस्ट २००९ ते जुलै २०१० दरम्यानच्या काळात राज्यसभेचे खासदार म्हणून कार्यरत होते. त्यांच्या निधनाची बातमी दिल्लीतील मॅक्स रुग्णालयाने दिली आहे. आज सकाळी सहा वाजता त्यांनी शेवटचा श्वास घेतला.

- Advertisement -

देशातील आणि विशिष्ठ मुंबईतील कामगारांसाठी आपले आयुष्य झिझवणारा एक कामगार नेता आज हरवला आहे. मी त्यांच्या अनेक चळवळी पाहिल्या आहेत. त्यांच्या विचाराची बैठक पक्की होती आणि कामगारांमध्ये त्यांना ओलावा होता. कामगारांसोबत घट्ट नाळ असलेला नेता गेला आहे. – कपील पाटील, आमदार शिक्षक भारती

जॉर्ज साहेबांच्या निधनाने या देशाच फार मोठ नुकसान झाले आहे. शरद राव साहेबांना या चळवळीमध्ये आणण्यामागे जॉर्ज साहेबांचा मोठा हाथ होता. हे कधीही न भरून निघणारे नुकसान आहे. नेहेमी आपले पाय जमिनीवर ठेवावे अशी त्यांची शिकवण होती. कितीही मोठा नेता असला तरीही लोकांशी योग्य रित्या संवाद साधनारा नेता आज आपण गमावला आहे. – शशांक राव,कामगार नेते

पंप्रधानांनी वाहिली श्रंद्धांजली

- Advertisement -


जॉर्ज फर्नान्डिस यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटवरून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांच्यामुळे भारत सुरक्षित आणि मजबूत बनला असल्याचे त्यांनी सांगितले.

“देशातील कामगार चळवळीला बळ आणि नवी दिशा देणारे लढव्ये नेते जॉर्ज फर्नांडिस यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले याचे मला दुःख आहे. जॉर्ज हे १९४९ च्या सुमारास मुंबईत आले आणि मुंबईचे झाले. मुंबईत कामगारांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी त्यांना न्यायदेण्यासाठी फर्नांडिस यांनी स्वतःला झोकून दिले. मुंबई म.न.पा. कर्मचाऱ्यांची सशक्त संघटना उभारली. रेल्वे कामगार संगटनांची जबाबदारी समर्थपणे सांभाळली. जॉर्ज एक निष्णात वाकपटू होते. विविध भाषांवरील त्यांचे प्रभुत्व वाखाणण्याजोगे होते. अशी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करणारा सामान्यांच्या – कामगारांच्या अस्मितेसाठी सतत लढा देणारा नेता आज आपण गमावला आहे. ते माझे व्यक्तीगत मित्र होते. त्यांच्या निधनाने एक जेष्ठ सहकाऱ्याला मी मुकलो आहे.” – शरद पवार ,राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष

“जॉर्ज फर्नांडीस भारतीय राजकारणातील एक वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्त्व होते. देशातील कामगार चळवळीला त्यांनी संघर्षाचा एक धगधगता आयाम दिला. त्यात त्यांच्या नेतृत्त्वाखाली सत्तरच्या दशकात झालेला रेल्वे कर्मचाऱ्यांचा अभूतपूर्व संप एक महत्त्वाचा अध्याय आहे. मुंबईसारख्या देशाच्या आर्थिक आणि औद्योगिक राजधानीतील संघटित कामगार हे त्यांच्या लढाऊ संघटन कौशल्याचे फलित आहे. देशाचे संरक्षण मंत्री म्हणून जबाबदारी बजावताना त्यांनी अणुचाचण्या घडवून आणण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. याशिवाय केंद्रीय मंत्रिमंडळात विविध महत्त्वाच्या विभागांच्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या. कोकण रेल्वेच्या उभारणीत त्यांचे मोलाचे योगदान होते.” – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

जॉर्ज फर्नांडिस यांच्या निधनाने देशानं महान संघर्षयोद्धा गमावला आहे. ते हाडाचे कामगारनेते होते. बंदसम्राट होते. कामगारशक्तीच्या बळावर मुंबईबंद करण्याची क्षमता असलेले ते एकमेव नेते होते. देशातली कामगार चळवळ आज पोरकी झाली आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री, संरक्षणमंत्री म्हणून त्यांनी केलेले कार्य सदैव स्मरणात राहील. जॉर्ज नावाचा झंझावात आता पुन्हा घोंगावणार नाही, याचं दुःख आहे. त्यांना माझी विनम्र श्रद्धांजली. – धनंजय मुंडे, विरोधी पक्षनेते 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -