घरदेश-विदेशगुलाम नबी आझादांना काँग्रेसचा दणका, १७ नेते स्वगृही परतले

गुलाम नबी आझादांना काँग्रेसचा दणका, १७ नेते स्वगृही परतले

Subscribe

Ghulam Nabi Azad | ताराचंद, माजी मंत्री पीरजादा मोहम्मद सईद, माजी आमदार बलवान सिंह, नरेश शर्मा, विनोद शर्मा, एमके भारद्वाज यांच्यासह १७ जण काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत.

Ghulam Nabi Azad | नवी दिल्ली – राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा जम्मू-काश्मीरला पोहोचायच्या आधीच काँग्रेसने गुलाम नबी आझाद यांच्या पक्षावर मोठा सर्जिकल स्ट्राईक केला आहे. माजी उपमुख्यमंत्री ताराचंद आणि माजी प्रदेश अध्यक्ष पीरजादा मोहम्मद सईद यांच्यासह १७ नेते आणि त्यांचे शेकडो समर्थक कार्यकर्ते काँग्रेसमध्ये परतले आहेत. १७ मोठ्या नेत्यांनी आज काँग्रेसच्या मुख्यालयात येऊन पक्षात प्रवेश केला. ताराचंद, माजी मंत्री पीरजादा मोहम्मद सईद, माजी आमदार बलवान सिंह, नरेश शर्मा, विनोद शर्मा, एमके भारद्वाज यांच्यासह १७ जण काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत.

हेही वाचा – कॉलेजियम प्रकरणात न्यायालयासमोर केंद्र सरकारची माघार; नेमकं काय घडलं?

- Advertisement -

काहीच महिन्यांपूर्वी गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसला रामराम ठोकून डेमोक्रेटिक आझाद पक्षाची (Democratic Azad Party) स्थापना केली होती. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसमधील अनेक नेतेही गेले होते. मात्र, त्यांच्यासोबत जाणं म्हणजे आमची खूप मोठी चूक असल्याचं म्हणत अनेक नेते पुन्हा स्वगृही परतले आहेत. याच महिन्यांत राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा जम्मू-काश्मीर येथे जाणार आहे. काँग्रेसने रणनीती आखत फारूख अब्दुल्ला, महबूबा मुफ्ती, कम्युनिस्ट नेता युसूफ तारिगामी आणि आवामी नॅशनल लीगचे मुज्जफर शाह यांना भारत जोडो यात्रेत सहभागी करून घेत गुलाम नबी आझाद यांना एकटं पाडलं आहे.

काश्मीर खोऱ्यात आपलं वर्चस्व टीकवण्याकरता गुलाम नबी आझाद यांनाही घरवापसी केल्याशिवाय पर्याय नाही, असा दावा राजकीय तज्ज्ञांकडून करण्यात येतोय. धर्मनिरपेक्ष ताकदींना कमजोर केले जात असल्याचा आरोप गुलाम नबी आझादांवर केला जातोय. तसंच, भाजपालाही त्यांचा छुपा पाठिंबा असल्याचा दावा ताराचंद यांनी केला आहे. त्यामुळे आझाद यांच्यासोबत गेलेले अनेकजण स्वगृही परतले आहेत. तसंच, गुलाम नबींनाही पुन्हा काँग्रेसमध्ये आणण्याची रणनीती सुरू असल्याची चर्चा पक्षामध्ये आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ग्वाल्हेर पोलिसांना सापडत नाही लालू यादव, शस्त्रास्त्र व्यवहार प्रकरणात 20 वर्षांपासून शोध सुरू

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -