घरदेश-विदेशनुपूर शर्मांविरोधातील सुप्रीम कोर्टाची टिपण्णी अपमानास्पद; ११७ मान्यवरांचे पत्र

नुपूर शर्मांविरोधातील सुप्रीम कोर्टाची टिपण्णी अपमानास्पद; ११७ मान्यवरांचे पत्र

Subscribe

नुपूर शर्मांनी त्वरित देशाची माफी मागावी. आताही त्यांनी संपूर्ण देशाची माफी मागावी अशा शब्दात सुप्रीम कोर्टाने नुपूर शर्मांवर ताशेरे ओढले आहेत

प्रेषित मोहम्मद पैगंबरांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्यामुळे भाजपच्या माजी प्रवक्त नुपूर शर्मा चांगल्याच अडचणीत सापडल्या आहेत. या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने नुपूर शर्मा यांनी चांगलेच फटकारले आहे. मात्र सुप्रीम कोर्टाचे फटकारने अपमानास्पद असल्याचे म्हणत देशातील 117 मान्यवरांनी पत्र प्रसिद्ध केलं आहे. या पत्रातून देशातील 117 मान्यवरांनी सुप्रीम कोर्टाच्या ताशेऱ्यांविरोधात टीका केली आहे. टीकाकारांमध्ये 15 निवृत्त न्यायाधीश, 77 निवृत्त नोकरशहा आणि 25 निवृत्त लष्कर अधिकाऱ्यांचा समावेश आहे. सुप्रीम कोर्टाने नुपूर शर्मांविरोधात ओढलेले ताशेरे अपमानास्पद असल्याचे मत मान्यवरांनी मांडले आहे.

सुप्रीम कोर्टाने काय म्हटले होते?

नुपूर शर्मांच्या बेजबाबदार वक्तव्यामुळे संपूर्ण देशात एकप्रकारे वणवा पेटला आहे. देशात त्यांच्या वक्तव्यामुळे ज्या घटना घडत आहेत, त्याला केवळ त्याच जबाबदार आहेत. नुपूर शर्मांनी त्वरित देशाची माफी मागावी. आताही त्यांनी संपूर्ण देशाची माफी मागावी अशा शब्दात सुप्रीम कोर्टाने नुपूर शर्मांवर ताशेरे ओढले आहेत.

- Advertisement -

मान्यवरांनी पत्रात म्हटले आहे की, देशात ज्या घटना सुरु आहेत त्या नुपूर शर्मा यांच्या वक्तव्यामुळे घडत असल्याचे म्हणणे म्हणजे उदयपूरमधील निघृण हत्या करणाऱ्यांची आभासी मुक्तता करण्यासारखं आहे. उदयपूरमध्ये नुपूर शर्मांच्या समर्थानार्थ सोशल मीडियावर गेल्या महिन्यात पोस्ट करणाऱ्या टेलरची गळा चिरून हत्या करण्यात आली. मारेकरांनी याचा व्हिडिओ शूट करत तो सोशल मीडियावरही शेअर केला. तर अमरावतीमध्येही एका मेडिकल व्यावसायिकाची गळा चिरून हत्या झाल्याची घटना घडली आहे.

नुपूर शर्मा यांच्याविरोधात देशात विविध ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. मात्र हे गुन्हे एकत्र करण्यासाठी नुपूर शर्मा यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने त्यांची याचिका फेटाळत खडेबोल सुनावले आहेत. प्रेषित मोहम्मद पैगंबरांविरोधातील टिपण्ण्या थिल्लर प्रसिद्धीसाठी, राजकीय हेतूने आणि दुष्कृत्यासाठी असल्याचे मत सुप्रीम कोर्टाने मांडले होते. मात्र सुप्रीम कोर्टाचे हे मत अंतिम आदेशाचा भाग नव्हते.

- Advertisement -

मात्र देशातील 117 मान्यवरांनी न्यायमूर्तींनी केलेली टिपण्णी दुर्दैवी असल्याचे म्हणत ती न्यायिक तत्त्वांशी सुसंगत असल्याचे पत्रात नमुद केले आहे. तसेच नुपूर शर्मांच्या याचिकेत उपस्थित मुद्दा आणि न्यायाधिशांच्या निरीक्षणाचा काहीही संबंध नाही, त्यामुळे नुपूर शर्मांचा न्याय नाकारण्यात आल्याचेही म्हटले आहे.

याशिवाय नुपूर शर्मा प्रकरणाला का वेगळ्या पद्धतीने हाताळल जात आहे, हे समजण्यात कोर्ट अपयशी ठरत असल्याचे मान्यवरांनी पत्रात म्हटले आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाचा हा दृष्टीकोन कौतुकास्पद नसून पवित्रतेला आणि सन्मानाला बाधा आणणार असल्याचे म्हटले आहे.

कोणी लिहिले हे पत्र?

नुपूर शर्मांच्या विरोधात न्यायालयाने केलेल्या टिपण्णीच्या विरोधात देशातील 117 मान्यवरांनी पत्र लिहिले आहे. या मान्यवरांमध्ये गुजरात उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश एस.एम. सोनी, राजस्थान उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आर.एस.राठोड आणि प्रशांत अग्रवाल, मुंबई उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश क्षितिज व्यास तसेच दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश एस.एन. धिंग्रा यांचा समावेश आहे. याशिवाय माजी आयएएस अधिकारी आरएस गोपालन आणि एस कृष्ण कुमार, माजी पोलीस अधिकारी एसपी वैद आणि पीसी डोगरा, लेफ्टनंट जनरल व्हीके चतुर्वेदी (निवृत्त), आणि एअर मार्शल एसपी सिंग (निवृत्त) यांचे नाव यात आहे.


आदित्य ठाकरेंच्या जवळच्या अधिकाऱ्याची बदली, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दणका


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -