घरदेश-विदेशकन्नड भाषेचा अनादर; अमित शाहांवर भडकले एचडी कुमारस्वामी, म्हणाले...

कन्नड भाषेचा अनादर; अमित शाहांवर भडकले एचडी कुमारस्वामी, म्हणाले…

Subscribe

कन्नड भाषेचा अनादर केल्याने कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामींनी शाहांना केले लक्ष्य

गृहमंत्री अमित शाह कर्नाटकच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर असून ते शनिवारी बंगळुरु येथे दाखल झाले. शनिवारी संध्याकाळी अमित शाह यांनी शिवमोगा जिल्ह्यात रॅपिड अॅक्शन फोर्स युनिटची पायाभरणी केली. दरम्यान, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्यावर चांगलाच निशाणा साधला आहे. यावेळी शिलान्यास कार्यक्रमात वापरल्या गेलेल्या फाउंडेशन पॅनेलमध्ये (foundation stone plaque) एचडी कुमारस्वामी यांनी हिंदी आणि इंग्रजी भाषा वापरल्याबद्दल अमित शाह यांच्याबद्दल संताप व्यक्त केला आहे. कुमारस्वामी यांनी ट्विटरच्या माध्यमातून असे म्हटले की, या फाउंडेशन पॅनेलमध्ये फक्त हिंदी आणि इंग्रजी भाषेचा वापर केला होता. परंतु यावर कन्नड भाषेचा समावेश नव्हता. त्यामुळे कन्नड भाषेचा अनादर केल्याचे स्पष्ट दिसत आहे.

कर्नाटकातील जनतेला स्पष्टीकरण द्यावं

दरम्यान, कुमारस्वामी यांनी आपल्या ट्विटमध्ये असेही म्हटले, “कर्नाटकात आरएएफ युनिटची पायाभरणी करण्यात आली. यावेळी फाऊंडेशन पॅनेलवर इंग्रजी आणि हिंदी भाषेचाच वापर केलेला दिसून आला. परंतु कन्नड भाषेकडे केलेले दुर्लक्ष हे अन्याय करण्यासारखे आहे. त्यामुळे अमित शाह यांनी कर्नाटकातील जनतेला स्पष्टीकरण द्यावे. ”

- Advertisement -

कन्नड लोकांकडून जमीन उपलब्ध

या देशात अनेक विविधता असलेल्या राज्याच्या संबंधित भाषेचा आदर करणे हे केंद्र सरकारचे कर्तव्य आहे, परंतु गृहमंत्री अमित शाह यांनी कन्नड भाषा आणि कन्नड लोकांचा अपमान करून दुर्लक्ष केले, असे कुमारस्वामी म्हणाले. यासह त्यांनी असेही सांगितले की, आरएएफच्या ज्या युनिटची पायाभरणी अमित शाह यांनी केली. यासाठी लागणारी जमीन कन्नड लोकांनीच उपलब्ध करून दिली होती. अशा परिस्थितीत कन्नड भाषेचेच दुर्लक्ष कसे झाले, याचे उत्तर गृहमंत्र्यांनी द्यावे, असे कुमारस्वामी म्हणाले.

- Advertisement -

आरएएफ युनिटच्या पायाभरणी कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पादेखील सहभागी होते. कुमारस्वामी यांनी येडियुरप्पा यांच्यावरही निशाणा साधला आहे. ते म्हणाले, गृहमंत्र्यांसह मुख्यमंत्र्यांनीही कर्नाटकमधील जनतेला फसवण्याचे काम केले आहे. अमित शाह यांनी शिवमोगा येथे भद्रावती रॅपिड अॅक्शन फोर्स सेंटरचे भूमिपूजन केले. बटालियन केंद्राचे उद्घाटन करताना शाह म्हणाले, सीआरपीएफच्या रॅपिड अॅक्शन फोर्सच्या ९७ व्या बटालियनची पायाभरणी येथे केली गेली याबद्दल मला आनंद झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -