घरक्राइमDelhi Mumbai Highway Accident : माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांच्या सूनेचा...

Delhi Mumbai Highway Accident : माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांच्या सूनेचा अपघातात मृत्यू, मुलगा मानवेंद्र गंभीर जखमी

Subscribe

दिल्ली – दिल्ली मुबंई एक्स्प्रेस वेवर नौगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीत एक भीषण अपघात झाला. यामध्ये माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांच्या सून आणि माजी खासदार मानवेंद्र सिंह यांची पत्नी चित्रा सिंह यांचा मृत्यू झाला आहे. कारमध्ये मानवेंद्र सिंह देखील होते, ते गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. अपघातात कार चालकही गंभीर जखमी आहे.

अपघातानंतर दोघांनाही अलवर येथील सोलंकी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मानवेंद्र यांचा कार चालकावर बडौदामेव हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. मानवेंद्र सिंह हे स्वतः कार चालवत होते, त्यांच्या बाजूला चित्रा सिंह बसलेल्या होत्या. मागच्या सीटवर मानवेंद्र यांचा मुलगा हमीर सिंह आणि चालक बसलेला होता.

- Advertisement -

दिल्लीहून जयपूरला निघाले होता सिंह परिवार

बाडमेरचे माजी खासदार मानवेंद्र सिंह त्यांची पत्नी चित्रा, मुलगा हमीर हे दिल्लीहून जयपूरला निघाले होते. दिल्ली – मुंबई एक्स्प्रेस वेवर पॉईंट 82.8 किलोमीटर वर रासगन ते खुशपुरी दरम्यान मानवेंद्र सिंह याचे अचानक गाडीवरील नियंत्रण सुटले आणि कार पुलाला जाऊन धडकली. या अपघातात मानवेंद्र सिंह यांची पत्नी चित्रा सिंह यांचा मृत्यू झाला. तर मानवेंद्र सिंह आणि त्यांचा मुलगा हमीर सिंह गंभीर जखमी आहेत. त्यांना तातडीने अलवर येथे उपचारासाठी हलवण्यात आले. चित्रा सिंह यांचा मृतदेह राजीव गांधी हॉस्पिटलमध्ये शवागारात ठेवण्यात आला आहे. तर मुलगा हमीर सिंहवर आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत.

हेही वाचा : Raid on Lalit Tekchandani : मुंबईतील बड्या बिल्डरवर EOW ची टाच; अनेक बडे मासे अडकण्याची शक्यता

- Advertisement -

जसवंत सिंह होते भाजपचे दिग्गज नेते

भाजपचे दिवंगत नेते जसवंत सिंह हे वाजपेयी सरकारच्या काळात 1996 मध्ये अर्थमंत्री होते. त्यानंतर 1998 ते 2002 मध्ये त्यांच्याकडे परराष्ट्र खाते देण्यात आले होते. 2002 मध्ये पुन्हा त्यांची वर्णी अर्थमंत्रीपदी लागली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -