घरदेश-विदेशपाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे निकटवर्तीय शेख रशीद यांना अटक

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे निकटवर्तीय शेख रशीद यांना अटक

Subscribe

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे माजी गृहमंत्री शेख रशीद यांना इस्लामाबाद पोलिसांनी अटक (Sheikh Rashid Arrested) केली आहे. त्यांचा पुतण्या शेख रशीद शफीक याने शेख रशीद यांच्या अटकेला दुजोरा दिला असल्याच, पाकिस्तानी चॅनल जिओ न्यूजने म्हटले आहे. दुसरीकडे, पाकिस्तानचा टीव्ही अँकर इम्रान रियाझ खान (Imran Riaz khan arrested) याला एफआयएने अटक केली आहे.

अवामी मुस्लिम लीगचे (AML) नेते आणि पीटीआयचे (PTI) सहयोगी शेख रशीद अहमद यांना आज, गुरुवारी पहाटे पोलिसांनी त्यांच्या निवासस्थानी अटक केली, असे वृत्त पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनने दिले आहे. त्यांच्या अटकेची कारवाई करताना सुमारे 300 ते 400 पोलिसांनी घराची तोडफोड केल्याचा दावा त्यांच्या पुतण्याने केला आहे. कोणत्याही वॉरंटशिवाय मला आबपारा पोलिस ठाण्यात नेण्यात आल्याचा आरोप शेख रशीद यांनी केला असल्याचे डॉन वृत्तपत्राने म्हटले असून यासाठी त्यांनी एआरवाय न्यूजने प्रसारित केलेल्या व्हिडीओचा हवाला दिला आहे.

- Advertisement -

एआरवाय न्यूजने प्रसारित केलेल्या या व्हिडीओमध्ये शेख रशीद यांनी सरकारवर अनेक आरोपही केले आहेत. पोलिसांना मला मारायचे आहे आणि त्यामुळे माझ्या जीवाला धोका असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तथापि, शेख रशिद यांना कोणत्या आरोपाखाली अटक करण्यात आली हे मात्र स्पष्ट झालेले नाही.

- Advertisement -

माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडून निषेध
आपला जवळचा सहकारी शेख रशीद यांना केलेल्या अटकेचा पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी केला आहे. हंगामी पंजाब सरकार पक्षपाती असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. अशा प्रकारे सूडबुद्धी कारवाई करणारे सरकार मी कधीच पाहिलेले नाही. आपला देश दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे आणि अशा परिस्थितीत शरीफ सरकार घाणेरडे राजकारण करत असल्याची टीका त्यांनी केली.

टीव्ही अँकर इम्रान रियाझला अटक
पाकिस्तानचा प्रसिद्ध टीव्ही अँकर इम्रान रियाझ खान याला देखील एफआयएने (Federal Investigation Agency) अटक केली आहे. त्याला विमानतळावर ताब्यात घेऊन अज्ञातस्थळी नेण्यात आले. मात्र, त्याच्याही अटकेचे नेमके कारण समोर आलेले नाही.

गेल्या आठवड्यात फवाद चौधरींना केली होती अटक
माजी मंत्री फवाद चौधरी यांना गेल्या आठवड्यात पोलिसांनी अटक केली होती. निवडणूक आयोगाला जाहीरपणे धमकी दिल्याचा तसेच पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफचे प्रमुख इम्रान खान यांना अटक करण्याचे कारस्थान विद्यमान सरकार करत असल्याचा आरोप फवाद चौधरी यांनी केला होता. याचप्रकरणात त्यांना अटक करण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -