घरताज्या घडामोडी'दहशतवादी, खुनी म्हणून न बघता आमच्याकडे पीडित म्हणून पाहा'; राजीव गांधींच्या मारेकऱ्याची...

‘दहशतवादी, खुनी म्हणून न बघता आमच्याकडे पीडित म्हणून पाहा’; राजीव गांधींच्या मारेकऱ्याची विनंती

Subscribe

राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणातील दोषी नलिनी श्रीहरन हिच्यासह आणि पाच दोषींची आज सुटका करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती आर एस गवई आणि न्यायमूर्ती बीव्ही नागरत्न यांच्या खंडपीठाने राजीव गांधी हत्याकांडातील दोषींच्या सुटकेबाबत आदेश दिला.

राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणातील दोषी नलिनी श्रीहरन हिच्यासह आणि पाच दोषींची आज सुटका करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती आर एस गवई आणि न्यायमूर्ती बीव्ही नागरत्न यांच्या खंडपीठाने राजीव गांधी हत्याकांडातील दोषींच्या सुटकेबाबत आदेश दिला. तरुंगातून सुटल्यानंतर या दोषींमधील एकाने म्हणजेच आरपी रविचंद्रन यांनी उत्तर भारतीय नागरिकांकडे ”आमच्याकडे दहशतवादी किवा खुनी या नजरेने न बघता पीडितांच्या नजरेने पाहा”, अशी विनंती केली आहे. (former pm rajiv gandhi case convict said himself victim see us as victims not killers)

राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणातील नलिनी श्रीहरन तिचा पती व्ही. श्रीहरन उर्फ ​मुरुगन, सुतेंत्र राजा संतान, रविचंद्रन, रॉबर्ट पायस आणि जयकुमार यांची तुरुंगातून सुटका करण्याचे आदेश दिले. संतान, रॉबर्ट आणि जयकुमार हे श्रीलंकन नागरिक आहेत. तर नलिनी, श्रीहरन आणि रविचंद्रन हे तामिळनाडूचे नागरिक आहेत.

- Advertisement -

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येतील सहा दोषींपैकी आरपी रविचंद्रन यांना शनिवारी सोडण्यात आले. मदुराई मध्यवर्ती कारागृहातून सुटका झाल्यानंतर आरपी रविचंद्रन यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले की, “उत्तर भारतातील लोकांनी आम्हाला दहशतवादी किंवा खुनी म्हणून न पाहता पीडित म्हणून पाहिले पाहिजे. कोण दहशतवादी आणि कोण स्वातंत्र्यसैनिक सैनिक हे वेळ आणि शक्ती ठरवते. पण जरी आम्ही दहशतवादी असण्याचा आरोप सहन केला तरी, वेळेने आम्हाला निर्दोष ठरवेल”, असे सांगितले.

“सर्वोच्च न्यायालयाने 18 मे रोजी एजी पेरारिवलन यांना मुक्त करण्यासाठी संविधानाच्या कलम 142 अंतर्गत आपल्या असाधारण अधिकारांचा वापर केला. राजीव गांधी हत्या प्रकरणातील सात दोषींपैकी पेरारिवलन हा देखील एक होता. तत्पूर्वी, या प्रकरणातील सहा दोषींपैकी एक असलेल्या नलिनी श्रीहरनने तिच्या 32 वर्षांच्या शिक्षेदरम्यान तिला “मदत” केल्याबद्दल तामिळनाडू आणि केंद्र सरकारचे आभार मानले आणि तिला तिच्या कुटुंबासोबत राहायचे आहे. देशातील सर्वात जास्त काळ जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या नलिनी श्रीहरन यांची शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर शनिवारी वेल्लोर तुरुंगातून सुटका करण्यात आली”, असे आरपी रविचंद्रन यांनी सांगितले.

- Advertisement -

आरपी रविचंद्रन यांच्यासह सहाही दोषींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. तुरुंगातून बाहेर आल्यावर नलिनी यांनी 32 वर्षे साथ दिल्याबद्दल तामिळनाडूतील जनतेचे आभार मानले. नलिनी म्हणाली की तिचे संपूर्ण कुटुंब खूप दिवसांपासून तिची वाट पाहत आहे आणि आता तिला त्यांच्यासोबत राहायचे होते. या सुटकेनंतर ती गांधी कुटुंबातील कोणाला भेटणार का, असे विचारले असता, नलिनी यांनी उत्तर दिले की, “अशी कोणतीही योजना नाही. होय, माझे पती गेले तर मी जाईन. आमच्या कुटुंबाने 32 वर्षे आमची वाट पाहिली. मला राज्य आणि केंद्र सरकारचे आभार मानायचे आहेत. मला पॅरोल दिल्याबद्दल मी राज्य सरकारचे आभार मानतो”, असे तिने सांगितले.

राजीव गांधी यांची 21 मे 1991 रोजी तामिळनाडूच्या श्रीपेरुंबदुर येथे लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम (LTTE) गटातील महिला आत्मघाती बॉम्बरने हत्या केली होती. हत्येतील भूमिकेसाठी सात दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. यामध्ये नलिनी श्रीहरन, आरपी रविचंद्रन, जयकुमार, संथन, मुरुगन, रॉबर्ट पायस आणि एजी पेरारिवलन यांचा समावेश होता.

2000 मध्ये नलिनी श्रीहरन यांची शिक्षा कमी करून जन्मठेपेत आणण्यात आली होती. नंतर 2014 मध्ये, इतर सहा दोषींची शिक्षा देखील कमी करण्यात आली आणि त्याच वर्षी, तामिळनाडूच्या तत्कालीन मुख्यमंत्री जे जयललिता यांनी या प्रकरणातील सर्व सात दोषींना सोडण्याची शिफारस केली.


हेही वाचा – भाजपची नवी खेळी, सुषमा अंधारेचे पती शिंदे गटात जाणार

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -