घरताज्या घडामोडीमाजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची अमेरिकेची राज्यघटना रद्द करण्याची मागणी

माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची अमेरिकेची राज्यघटना रद्द करण्याची मागणी

Subscribe

अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २०२४मध्ये होणाऱ्या राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. निवडणूक लढवण्याच्या घोषणेनंतर ट्रम्प चर्चेत आले आहेत. अशातच ट्रम्प यांनी २०२०च्या राष्ट्रपती पादाच्या निवडणुकीचा मुद्दा पुन्हा उखडून काढला आहे.

अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २०२४मध्ये होणाऱ्या राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. निवडणूक लढवण्याच्या घोषणेनंतर ट्रम्प चर्चेत आले आहेत. अशातच ट्रम्प यांनी २०२०च्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचा मुद्दा पुन्हा उकरून काढला आहे. तसेच, याबाबत डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी 2020 मध्ये अमेरिकेत झालेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीमध्ये मोठी फसवणूक झाल्याचा आरोप केला आहे. तसेच, अमेरिकेची राज्यघटना रद्द करण्याची मागणी केली आहे. (Former President Donald Trump demands the cancellation of US Constitution)

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या या घोषणेनंतर अमेरिकेच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी आपल्या ट्रुथ सोशल अॅपवर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये केवळ २०२०च्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवर फसवणुकीचे आरोप करतानाच बड्या टेक कंपन्यांवरही आरोप केले आहेत. २०२० च्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मोठ्या टेक कंपन्या डेमोक्रॅटिक पक्षाकडे वळल्या असून त्यांच्याविरोधात होत्या, असेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -

शिवाय, अमेरिकेची राज्यघटना रद्द करावी अशी मागणी ट्रम्प यांनी केली. दरम्यान, डेमोक्रॅटिक नेते हकीम जेफ्रीज यांनी रविवारी ट्रम्प यांच्या विधानाचे वर्णन विचित्र आणि अतिरेकी म्हणून केले. तसेच, रिपब्लिकनला ट्रम्प यांच्या डेमोक्रॅसीविरोधी कल्पना चालू ठेवावेत की नाही हे निवडावे लागेल. ट्रम्प यांच्या टिप्पण्यांविषयी विचारले असता, हाऊस इंटेलिजेंस कमिटीचे अव्वल रिपब्लिकन ओहायोचे माईक टर्नर म्हणाले की ते ट्रम्प यांच्या निवेदनापासून सहमत नाहीत आणि या टिप्पणीचा निषेध करतात.

ट्रम्प यांच्या वक्तव्यावर, व्हाईट हाऊसचे प्रवक्ते अँड्र्यू बेट्स म्हणाले की त्यांचे विधान आपल्या देशाच्या आत्म्यासाठी शाप आहे. ट्रम्प यांच्या टिप्पणीचा जगभर निषेध केला जात आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ‘आमच्यामध्ये काय हिंमत आहे हे आम्ही…’, शंभुराज देसाईंचा संजय राऊतांवर हल्लाबोल

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -