घरदेश-विदेशपाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांचे निधन, दुबईत घेतला अखेरचा श्वास

पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांचे निधन, दुबईत घेतला अखेरचा श्वास

Subscribe

Former President of Pakistan Pervez Musharraf passed away | गेल्या अनेक दिवसांपासून अमाइलॉइडोसिस आजाराशी लढा देत होते. दिर्घ काळ रुग्णालयात राहिल्यानंतर वयाच्या ७९ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली.

Former President of Pakistan Pervez Musharraf passed away | पाकिस्तानचे माजी राष्ट्रापती जनरल परवेझ मुशर्रफ यांचे रविवारी निधन झाले. पाकिस्तानच्या वृत्तांनुसार ही माहिती समोर आली असून दुबईतील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते गेल्या अनेक दिवसांपासून अमाइलॉइडोसिस आजाराशी लढा देत होते. दिर्घ काळ रुग्णालयात राहिल्यानंतर वयाच्या ७९ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली.

गेल्या सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधीपासून परवेझ मुशर्रफ (Pervez Musharraf) दुबईतील अमेरिकन रुग्णालयात उपचार घेत होते. १० जून २०२२ रोजी त्यांच्या कुटुंबियांकडून एक पत्रक जारी करण्यात आलं होतं. त्यानुसार, त्यांची प्रकृती चिंताजनक असून अनेक अवयव निकामी झाले होते. परंतु ते व्हेटिंलेटवर नसल्याचंही सांगण्यात आलं होतं. तसंच, त्यावेळी ते ३ आठवड्यांपेक्षा जास्त काळ रुग्णालयात दाखल होते.

- Advertisement -

म्हणजेच, ते मे २०२२ पासून रुग्णालयात उपचार घेत होते. आज त्यांची प्रकृती आणखी खालावली आणि त्यांची दीर्घ काळाच्या प्रयत्नांनंतर त्यांची प्राणज्योत मालवली.

११ ऑगस्ट १९४३ मध्ये नवी दिल्लीत त्यांचा जन्म झाला होता. १९४७ मध्ये त्यांच्या कुटुंबीयाने पाकिस्तानात जाण्याचा निर्णय घेतला. फाळणीच्या काही दिवस आधीच ते पाकिस्तानात स्थायिक झाले होते. त्यांचे वडील सईद यांनी पाकिस्तान सरकारसाठी काम करायला सुरुवात केली होती. ते परदेशी मंत्रालयाशी संबंधित काम करत होते.

- Advertisement -

हेही वाचा पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेज मुशर्रफ यांची प्रकृती चिंताजनक

त्यांचे वडिल सईद यांची तुर्की येथे ट्रान्सफर झाली. त्यामुळे ते १९४९ मध्ये तुर्कीत गेले. काही वर्षे ते येथेच राहिले. त्यामुळे त्यांनी तुर्की भाषाही आत्मसात केली. १९५७ मध्ये त्यांचं संपूर्ण कुटुंब पुन्हा पाकिस्तानात परतलं. त्यांचं शिक्षण कराचीतील सेंट पॅट्रिक शाळेत झालं तर लाहोरच्या फॉरमेन ख्रिश्चन महाविद्यालयात त्यांनी पुढील शिक्षण घेतलं. मुशर्रफ यांनी 1999 ते 2008 पर्यंत पाकिस्तानवर राज्य केले. मुशर्रफ मार्च 2016 पासून दुबईत राहत होते.

कारगिल युद्धात त्यांचा हात

भारताविरोधात कारगिल युद्धातही त्यांचा मोठा हात होता. कारगिलमध्ये घुसखोरी करून विजय मिळवता येईल असं परवेझ मुशर्रफ यांना वाटलं होतं, पण तसं होऊ शकलं नाही. याउलट या युद्धात अनेक पाकिस्तानी सैनिकांनी आपले प्राण गमावले. यानंतर त्यांनी भारताची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला.

परवेझ मुशर्रफ सहा वर्षांपूर्वी उपचारांसाठी दुबईला गेले होते. मात्र, ते तिथून पाकिस्तानात परतलेच नाहीत. पाकिस्तानात परतल्यावर त्यांना अटक केली जाईल, अशी त्यांना भिती होती म्हणून ते पाकिस्तानात परतले नसल्याचं सांगितलं जातं.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -