घरदेश-विदेशश्रीलंकेच्या माजी राष्ट्रपतींनी सोडले सिंगापूर, घेतला 'या' देशाचा आश्रय

श्रीलंकेच्या माजी राष्ट्रपतींनी सोडले सिंगापूर, घेतला ‘या’ देशाचा आश्रय

Subscribe

श्रीलंकेच्या माजी राष्ट्रपतींनी सिंगापूर सोडले आहे. सिंगापूरच्या इमिग्रेशन अधिकार्‍यांनी गुरुवारी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांना कायदेशीर कारणांमुळे सिंगापूर सोडावे लागले आहे. एएफपीच्या वृत्तसंस्थेनुसार, सिंगापूरच्या इमिग्रेशन अधिकार्‍यांनी गुरुवारी या वृत्ताला दुजोरा दिला, त्यांनी ठराविक कालावधीनंतर देश सोडल्याचे सांगितले.

राजपक्षे थायलंडमध्ये –

- Advertisement -

एका रिपोर्ट्सनुसार ते थायलंडला गेले आहे. अलीकडेच थायलंडने राजपक्षे यांना देशात तात्पुरता मुक्काम करण्यास सहमती दर्शवली आहे. थायलंडमधील त्यांच्या वास्तव्यादरम्यान, राजपक्षे तिसऱ्या देशात स्वत:साठी कायमस्वरूपी आश्रय शोधण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

जुलैमध्ये सोडले सिंगापूर –

जुलैमध्ये श्रीलंकेतील सरकारविरोधी निदर्शनांदरम्यान देश सोडल्यानंतर सिंगापूरमध्ये राहणारे राजपक्षे हे थायलंडमध्ये आश्रय शोधत होते. त्यांच्या सिंगापूर व्हिसाची मुदत गुरुवारी संपली होती. ते 13 जुलै रोजी मालदीवमध्ये पोहोचले आणि त्यानंतर सिंगापूरला गेले जेथे त्यांनी देशाच्या आर्थिक संकटाच्या निषेधार्थ राजीनामा जाहीर केला.

मानवतावादी आधारावर आश्रय मागितला  –

बँकॉक पोस्ट या वृत्तपत्राने प्रयुतच्या हवाल्याने लिहिले की, हा मानवतेचा मुद्दा आहे. हा तात्पुरता मुक्काम असल्याचे आम्ही सांगितले आहे. त्यांना कोणत्याही राजकीय चर्चांना परवानगी नाही. यामुळे त्यांना आश्रय घेण्यासाठी देश शोधण्यात मदत होईल. वृत्तानुसार, परराष्ट्र मंत्री डी प्रमुदुविनाई यांनी सांगितले की, माजी राष्ट्रपती राजपक्षे यांच्याकडे अजूनही डिप्लोमॅटिक पासपोर्ट असल्याने ते 90 दिवस थायलंडमध्ये राहू शकतात.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -