माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले असून त्यांच्यावर आर्मी रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती पीटीआयने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. आजच त्यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. याबाबत त्यांनी स्वत: ट्विट करत ही माहिती दिली होती.
Former President Pranab Mukherjee is on ventilator support at Army’s R&R hospital: Sources
— Press Trust of India (@PTI_News) August 10, 2020
प्रवण मुखर्जी यांनी ट्विटमध्ये असे लिहिले आहे की, ‘एका दुसऱ्या कारणासाठी आपण रुग्णालयात गेलो होतो. यावेळी मला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. गेल्या आठवड्यात माझ्या संपर्कात जे कोणी लोक आले आहेत, त्यांनी सर्वांनी कोरोना टेस्ट करा आणि आयसोलेटेड व्हा’, अशी विनंती त्यांनी केली आहे. प्रवण मुखर्जी यांच वय ८४ वर्षे आहे. अशा परिस्थितीत वाढत्या वयामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काँग्रेसचे दिग्गज नेते प्रणव मुखर्जी हे २०१२ ते २०१७ पर्यंत देशाचे राष्ट्रपती होते. २०१९ सोली केंद्र सरकारने प्रणव मुखर्जी यांना भारतरत्न देऊन सन्मानित केले आहे.
हेही वाचा – धक्कादायक! कोरोनामुळे वडिलांचे निधन, मृतदेह पाहण्याचे मागितले ५१ हजार