Corona: माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना कोरोनाची लागण!

Pranav Mukharjee

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यांनी याबाबत स्वत: ट्विट करत माहिती दिली आहे. तसेच मागील आठवड्यात त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना कोरोना टेस्ट आणि आयसोलेटेड होण्यास त्यांनी सांगितले आहे.

प्रवण मुखर्जी यांनी ट्विटमध्ये असे लिहिले आहे की, ‘एका दुसऱ्या कारणासाठी आपण रुग्णालयात गेलो होतो. यावेळी मला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. गेल्या आठवड्यात माझ्या संपर्कात जे कोणी लोक आले आहेत, त्यांनी सर्वांनी कोरोना टेस्ट करा आणि आयसोलेटेड व्हा’, अशी विनंती त्यांनी केली आहे.

प्रवण मुखर्जी यांच वय ८४ वर्षे आहे. अशा परिस्थितीत वाढत्या वयामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काँग्रेसचे दिग्गज नेते प्रणव मुखर्जी हे २०१२ ते २०१७ पर्यंत देशाचे राष्ट्रपती राहिले आहेत. २०१९ सोली केंद्र सरकारने प्रणव मुखर्जी यांना भारतरत्न देऊन सन्मानित केले आहे.

कोरोना विषाणूचे संकट देशात वेगाने पसरत आहे आणि आतापर्यंत अनेक दिग्गज मंडळींना कोरोनाची लागण झाली आहे. यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यानंतर त्यांना मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याशिवाय अर्जुन मेघवाल आणि इतर केंद्रीय मंत्र्यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. तसेच अनेक राज्य सरकारचे मंत्र्यांनी देखील कोरोना झाल्याचे समोर आले आहे. नुकतेच मध्य प्रदेश मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनीही कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळले होते. बराच काळ रुग्णालयात राहिल्यानंतर त्यांना सोडण्यात आले आहे.


हेही वाचा – गूड न्युज! दोन दिवसांत मिळेल जगातील पहिली कोरोनाची लस!