भारताचे पूर्व पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती सध्या ढासळली होते. गेल्या ९ आठवड्यांपासून अटल बिहारी वाजपेयींना दिल्लीतील ‘एम्स’ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं, त्यांच्यावर उपचार चालू होते. मात्र १५ ऑगस्टच्या संध्याकाळपासून त्यांची प्रकृती अतिशय बिघडली असल्याचं हॉस्पिटलकडून सांगण्यात आलं. गेल्या २४ तासामध्ये अटल बिहारी वाजपेयी यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. मात्र, त्यांच्या प्रकृतीमध्ये कोणताही सुधारणा नसल्याचं समोर आलं. १६ ऑगस्टला संध्याकाळी ५ वाजून ५ मिनिटांनी वाजपेयी कालवश झाले.
कोणत्या आजारांनी ग्रस्त होते वाजपेयी?
वाजपेयींना डिम्नेशिया हा मुख्य आजार आहे. त्याव्यतिरिक्त किडनी संसर्ग, छातीवर दाब निर्माण होणे, युरेटर संसर्ग हे आजारदेखील जडलेले आहेत. सध्या वाजपेयींचं वय ९४ असल्यामुळं त्यांचं शरीरही उपचाराला साथ देत नाही. दरम्यान २००९ पासून वाजपेयी डिम्नेशिया या आजारानं ग्रस्त आहेत. ११ जूनपासून वाजपेयी हॉस्पिटमध्ये होते.
काय आहे डिम्नेशिया?
डिम्नेशियामध्ये माणसाची स्मरणशक्ती कमी होते. रोजचं कामदेखील एखाद्या व्यक्तीला नीट जमू शकत नाही. यामध्ये माणसाची स्मरणशक्ती इतकी कमी होते की, आपलं स्वतःचं नावदेखील त्या व्यक्तीला लक्षात राहात नाही. याचा इतका परिणाम होतो की, बोलताना शब्दही विसरायला होतात. इतकंच नाही हा आजार असणाऱ्या व्यक्तीचा मूड सतत बदलत राहातो. बऱ्याचदा वय वाढतं तसा हा आजार होण्याची शक्यता निर्माण होते. डिम्नेशियाग्रस्त व्यक्ती लवकर वैतागतो आणि सतत उदास राहण्याची त्या व्यक्तीची लक्षणं असतात.
डिम्नेशियाची लक्षणं
१) डिम्नेशियाचे रूग्ण आपलं नाव, जागेचं नाव आणि तारीख सगळ्या गोष्टी विसरू लागतो
२) अशा व्यक्तीबरोबर बोलणं अतिशय कठीण होतं आणि त्याचं वागणंही बदलतं
३) डिम्नेशियाग्रस्त व्यक्तींना खाण्यापिण्यात आणि गिळण्याचाही त्रास होतो
४) याव्यतिरिक्त चालण्या – फिरण्याचाही त्रास होतो
५) कोणताही निर्णय घेण्याची रोग्याची क्षमता संपुष्टात येते
केवळ एका किडनीवर होते वाजपेयी
अटल बिहारी वाजपेयी यांना युरिन संसर्ग आणि किडनीशी संबंधित आजारही होते. त्यांची एकच किडनी कार्यरत होती. याशिवाय वाजपेयी मधुमेहानंदेखील ग्रस्त होते. २००९ मध्ये स्ट्रोक आल्यानंतर त्यांची विचार करण्याची क्षमता संपली. त्यानंतर त्यांचं संपूर्ण सार्वजनिक आयुष्य कमी झालं.