पाकिस्तानात राजकीय गोंधळ सुरू असून माजी पंतप्रधान इम्रान खान यांना लवकरच अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. FIAकडून प्लान आखण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने पीटीआयचे अध्यक्ष आणि माजी पंतप्रधान इम्रान खान यांना प्रतिबंधित निधी प्रकरणात अटक करण्याचा निर्णय घेतला आहे. एजन्सीने अटकेसाठी चार सदस्यांची टीम तयार केली असून लाहोर पोलीस यामध्ये सहकार्य करतील.
अंतिम मंजुरीसाठी एफआयएच्या महासंचालकांकडे सारांश पाठवण्यात आला आहे. दरम्यान, पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमान पार्कच्या बाहेर उपस्थित आहेत. ही सुरक्षा इम्रान खान जामिनासाठी लाहोर उच्च न्यायालयात हजर राहण्यासंदर्भात आहे.
लाहोर उच्च न्यायालयाने माजी पंतप्रधानांना दुपारी 2 वाजता प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश दिले होते. परंतु शेवटचा अहवाल येईपर्यंत ते तेथे पोहोचले नाहीत. इम्रान खान लाहोरमध्ये त्यांच्या उपस्थितीदरम्यान, एफआयएकडून आणखी एका प्रकरणात अटक होण्याची शक्यता आहे. त्यांना सुरक्षेची चिंता आहे आणि जमान पार्कच्या बाहेर पीटीआय कार्यकर्त्यांचा मोठा मेळावाही आहे. त्यानंतर लाहोर उच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी सायंकाळी 5 वाजेपर्यंत पुढे ढकलली, असं इम्रान खानच्या कनिष्ठ वकिलांनी न्यायालयाला सांगितले.
न्यायालय इम्रान खान यांना कारणे दाखवा नोटीस बजावत आहे. माजी पंतप्रधानांच्या वकिलांनी उच्च न्यायालयाला तसे न करण्याची विनंती केली होती, असं न्यायमूर्ती तारिक सलीम म्हणाले.
हेही वाचा : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा, पुढील चार दिवस पाणी-बाणी