जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचे निधन

गोळीबाराचा आवाज स्थानिक लोकांनी ऐकला. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची परिस्थिती नाजूक असल्याचं सांगण्यात येतंय. दरम्यान, या हल्ल्यातील एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

जपानचे माजी पंतप्रधान आणि लिबरल डोमेस्टिक पक्षाचे अध्यक्ष शिंजो आबे यांचा गोळीबारात मृत्यू झाला आहे. निवडणुकीचा प्रचार सुरू असताना शिंजो आबे अचानक खाली कोसळले. त्यावेळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. तसेच, गोळी लागल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता. त्यांना वाचवण्यासाठी डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. मृत्यूसमयी ते ६७ वर्षांचे होते. दरम्यान, या हल्ल्यातील एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. (Former Prime Minister of japan Shinzo Abe passes away)

जपानमध्ये रविवारी राज्यसभेच्या निवडणुका आहे. या निवडणुकीच्या प्रचारासाठी शिंजो आबे टोक्योतील नारा शहरात आले होते. तिथे त्यांचं भाषण सुरू असतानाच ते अचानक खाली कोसळले. त्यावेळी उपस्थित जमावाला गोळीबाराचा आवाज आला. त्यांच्या छातीत दोन गोळ्या लागल्या होत्या, त्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. त्यांना पाठीमागून गोळी लागल्याची माहिती जपान टाईम्सने दिली.

हल्लेखोर यामागामी टेटसुया

काही महिन्यांपूर्वीच शिंजो आबे यांनी पंतप्रधान पद सोडलं होतं. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ते जवळचे मित्र असल्याचंही म्हटलं जातं.

हल्लोखोराला अटक

यामागामी टेटसुया या ४१ वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली आहे. तो मॅरिटाईम सेल्फ डिफेंस फोर्समध्ये कार्यरत होता. २००५ पर्यंत तीन वर्षे त्याने तिथे काम केले आहे. ज्याठिकाणी हल्ला झाला त्याठिकाणाहून पिस्तुल हस्तगत करण्यात आले आहे. हल्लेखोर यामागामी टेटसुया हा नारा शहरातीलच स्थायिक रहिवासी आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीत यामागामीने म्हटलं आहे की, तो माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर नाराज होता. त्यामुळे त्याला त्यांची हत्या करायची होती.

कोण होते शिंजो आबे?

शिंजो आबे यांनी सर्वाधिक काळ जपानच्या पंतप्रपधान पदाची धुरा सांभाळली होती. आपल्या कार्यकाळात धडाडीच्या अनेक योजना रावबत त्यांनी जपानमधील स्थिती आणि प्रगतीसाठी आपल्या राजकीय कारकीर्दीत काम केलं. यामुळे राजकारणात सतत सक्रिय असलेले शिंजो आबे हे नाव त्यांच्या कारकीर्दीत प्रचंड गाजलं. त्यांनी राबावलेली जी धोरणे होती ती आबे नॉमिक्स म्हणून ओळखली जाऊ लागली. शिंजो आबे यांची भारताशी देखील तितकेच जवळचे नाते आहे. तसेच त्यांच्या पंतप्रधान पदाच्या कारकीर्दीत सर्वाधिक वेळा भारताला भेट देणारे पंतप्रधान ठरले होते.

गेल्याचवर्षी त्यांना भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्कार देखील मिळाला होता. शिंजो आबे आणि भारताचे संबंध कसे होते.

तब्बल सहा वेळा निवडणुका जिंकण्याचा तगडा अनुभव त्यांच्याजवळ होता. 2006 मध्ये पंतप्रधान पद गेल्यानंतर त्यांना 2014 मध्ये पुन्हा संधी मिळाली. तर 2020 मध्ये त्यांनी या पदाचा राजीनामा दिला. मात्र त्यांच्या या राजकीय कारकीर्दीत भारताचे आणि जपानचे संबंध कसे होते याबद्दल देखील अनेकदा चर्चा होत असे. इतकंच काय तर जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खास मित्र असून गेल्या वर्षी भारताने शिंजो आबे यांना पद्मविभूषण देऊन गौरवले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, माझे जपानचे मित्र शिंजो आबे जी अशी व्यक्ती आहेत ज्यांचे नाव विसरता येणार नाही. आम्ही तुम्हाला सांगतो की जेव्हा शिंजो आबे पंतप्रधान म्हणून काशीला आले तेव्हा रुद्राक्षच्या कल्पनेवर दीर्घ चर्चा झाली होती. त्यांनी ताबडतोब आपल्या अधिकाऱ्यांना काम करण्यास सांगितले.

भारत आणि जपानची मैत्री अधिक दृढ व्हावी याकरीता आबे अनेकदा भारतात आले होते. 2001 मध्ये दोन्ही देशामध्ये अधिकृतपणे ग्लोबल पार्टनर्शिप सुरू झाली आणि 2005 मध्ये वार्षिक द्विपक्षीय बैठका घेण्याचे ठरले.

हा आबे यांच्या कार्यकाळातील भारतासोबतचा सर्वात चर्चेचा करार आहे. याची सुरुवात करण्यासाठी आबे पहिल्यांदा भारतात आले, तेव्हा त्यांनी ‘दोन महासागरांचा संगम’ बोलून भारताची मने जिंकली होती. त्यानंतर भारतात सरकार बदलले पण दोन्ही देशांमधील मैत्रीचा पाया त्याच समर्पणावरच उभा राहिला.