Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश राजीव गांधींच्या राजकीय प्रवेशाला सोनिया गांधींचा होता विरोध, झाले देशाचे सर्वात तरुण...

राजीव गांधींच्या राजकीय प्रवेशाला सोनिया गांधींचा होता विरोध, झाले देशाचे सर्वात तरुण पंतप्रधान

Subscribe

31 ऑक्टोबर 1984 ते 2 डिसेंबर 1989 दरम्यान राजीव गांधी भारताचे पंतप्रधान होते. भारतात कॉम्प्युटर आणण्यात, आणि एकंदरीतच 21 व्या शतकासाठी भारताला सज्ज करण्यात राजीव यांचा मोठा वाटा होता. 21 मे 1991 रोजी तामिळनाडूमधील श्रीपेरंबुदूरमध्ये लिट्टेच्या अतिरेक्यांनी त्यांची हत्या केली. आज त्यांची जयंती आहे.

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची आज 79वी जयंती आहे. त्यांचे पुत्र आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी लडाखमध्ये आदरांजली वाहिली. 31 ऑक्टोबर 1984 ते 2 डिसेंबर 1989 दरम्यान राजीव गांधी भारताचे पंतप्रधान होते. भारतात कॉम्प्युटर आणण्यात, आणि एकंदरीतच 21 व्या शतकासाठी भारताला सज्ज करण्यात राजीव यांचा मोठा वाटा होता. 21 मे 1991 रोजी तामिळनाडूमधील श्रीपेरंबुदूरमध्ये लिट्टेच्या अतिरेक्यांनी त्यांची हत्या केली. आज त्यांची जयंती आहे. त्याच निमित्ताने त्यांच्याविषयी काही रंजक गोष्टी जाणून घेऊया. ( Former Prime minister Rajiv Gandhi birth Anniversary tribute from rahul gndhi in ladakh  )

राजीव गांधी यांचा जन्म 1944 मध्ये झाला. भारत स्वतंत्र झाला तेव्हा ते फक्त तीन वर्षांचे होते आणि त्यांचे आजोबा जवाहरलाल नेहरू देशाचे पहिले पंतप्रधान झाले. त्यांनी सुरुवातीचे शिक्षण डेहराडूनमधील वेल्हम स्कूलमधून केलं. मग दून शाळेत गेला. 1966 मध्ये राजीव गांधींनी दिल्लीतील फ्लाइंग क्लबची परीक्षा उत्तीर्ण केली आणि ते व्यावसायिक पायलट बनले. नंतर त्यांनी इंडियन एअरलाइन्समध्ये नोकरी सुरू केली.

- Advertisement -

सोनिया गांधींचं राजीव गांधी यांच्याशी लग्न झाल्यानंतर राजीव गांधी यांनी राजकारणात येऊ नये, अशी सोनिया गांधी यांची इच्छा होती. तसंच, राजीव गांधींनाही राजकारणात रस नव्हता. आणीबाणीच्या काळात इंदिराजींच्या नंतरचे सर्वात शक्तिशाली नेते संजय गांधी होते. आणीबाणीच्या निर्णयावर राजीव गांधी आणि सोनिया गांधी दोघेही खूश नव्हते, असं म्हटलं जातं. 1980 ची गोष्ट आहे. संजय गांधी यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. यामुळे इंदिरा गांधी यांनी राजीव गांधींना विमान न उडवण्यासाठी दबाव आणला. राजीव गांधी त्यांच्या आईला नाउमेद करण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांनी ती नोकरी सोडली आणि राजकारणात सक्रीय झाले. पुढे ते भारताचे सर्वात तरूण पंतप्रधानही बनले.

इंदिरा गांधींच्या हत्येची घोषणा राजीव गांधींनी केली

1984 मध्ये इंदिरा गांधींची हत्या झाली तेव्हा राजीव गांधी पश्चिम बंगलामध्ये सभा घेत होते. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी त्यांच्या द टर्ब्युलंट इयर्स 1980-96 या पुस्तकात त्या दिवसाच्या घटनेचा उल्लेख केला आहे.

- Advertisement -

31 ऑक्टोबरला राजीव गांधी पश्चिम बंगालमध्ये सभेला संबोधित करत होते. राजीव गांधींनी भाषण सुरू करताच मंत्री प्रणव मुखर्जी यांना पोलिसांच्या वायरलेसवर संदेश मिळाला की इंदिरा गांधींवर हल्ला झाला आहे, त्यांनी ताबडतोब दिल्लीला परतावं.

प्रणव मुखर्जी यांनी राजीव गांधींना ताबडतोब एक पत्रक दिलं आणि त्यांचं भाषण कमी करण्यास सांगितलं. राजीव गांधी यांनी भाषण उरकलं आणि त्यानंतर सर्व कार्यक्रम रद्द करून ते दिल्लीच्या दिशेनं रवाना झाले.

दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास त्यांनी कोलकाताहून दिल्लीला जाण्यासाठी फ्लाइट घेतली. त्यांच्यासोबत पश्चिम बंगालचे तत्कालीन राज्यपाल उमाशंकर दीक्षित, त्यांच्या सून शीला दीक्षित, लोकसभा अध्यक्ष बलराम जाखड, राज्यसभेचे उपसभापती शीनलाल यादव यासारख्या दिग्गज व्यक्ती होत्या.

टेक ऑफ झाल्यानंतर काही वेळातच राजीव गांधी कॉकपिटमध्ये गेले. काही वेळाने परत आले आणि विमानात घोषणा केली त्यांच्या आई इंदिरा गांधी मरण पावल्या आहेत. विमानात शांतता पसरली.

यानंतर विमानात उपस्थित नेत्यांनी चर्चा केली आणि राजी गांधी यांना पंतप्रधानपदी शपथ घेण्यासाठी राजी करण्याचे काम प्रणव मुखर्जी यांना देण्यात आले. दुपारी तीनच्या सुमारास ते दिल्लीला पोहोचले. येथून ते थेट एम्समध्ये पोहोचले. जिथे इंदिरा गांधी यांचं पार्थिव ठेवण्यात आलं होतं.

( हेही वाचा: सत्तेत गेलो म्हणून भूमिका बदलली नाही, ‘त्या’ वक्तव्यावर भुजबळांचे स्पष्टीकरण )

- Advertisment -