Friday, March 28, 2025
27 C
Mumbai
Homeदेश-विदेशShaktikanta Das : शक्तिकांत दास यांची पंतप्रधान मोदींच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती

Shaktikanta Das : शक्तिकांत दास यांची पंतप्रधान मोदींच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती

Subscribe

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) माजी गव्हर्नर शक्तिकांत दास यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नवे प्रधान सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने आज (22 फेब्रुवारी) प्रधान सचिव-2 म्हणून त्यांची नियुक्ती मंजूर केली. 

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) माजी गव्हर्नर शक्तिकांत दास यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नवे प्रधान सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शक्तिकांत दास यांची नियुक्ती केंद्र सरकारच्या महत्त्वाच्या निर्णयांपैकी एक मानली जात आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने आज (22 फेब्रुवारी) प्रधान सचिव-2 म्हणून त्यांची नियुक्ती मंजूर केली. या निर्णयानंतर सरकारच्या प्रशासकीय रचनेत मोठा बदल दिसून येण्याची शक्यता आहे. (Former RBI Governor Shaktikanta Das appointed as Principal Secretary to Prime Minister Modi)

शक्तिकांत दास हे गेल्या वर्षी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) गव्हर्नर पदावरून निवृत्त झाले होते. यानंतर आता त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव-2 म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे पीके मिश्रा 11 सप्टेंबर 2019 पासून आतापर्यंत प्रधान सचिव हे पद भूषवत आहेत. त्यामुळे आता शक्तिकांत दास आणि पीके मिश्रा हे दोघे एकत्र पंतप्रधान कार्यालयात अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडताना दिसतील. मिळालेल्या माहितीनुसार, शक्तिकांत दास यांची नियुक्ती पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळापर्यंत किंवा पुढील आदेशापर्यंत कायम राहणार आहे.

हेही वाचा – New Corona Virus : चीनमध्ये आढळला नवा कोरोना; जनावरांमधून माणसांना होतोय संसर्ग; वाचा सविस्तर

शक्तीकांत दास यांनी 40 वर्षांहून अधिक काळ नोकरशाही कारकिर्दीत तामिळनाडू सरकारपासून ते केंद्र सरकारपर्यंत महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. त्यांची आता प्रधान सचिवपदी अशावेळी नियुक्ती झाली आहे, जेव्हा भारताची अर्थव्यवस्था अनेक आव्हानांना तोंड देत आहे. जागतिक बाजारपेठेतील अस्थिरता, महागाई आणि राजकोषीय तूट यासारख्या समस्या लक्षात घेता, सरकारला अनुभवी प्रशासकाची आवश्यकता होती. अशा परिस्थितीत, शक्तिकांत दास यांचा अनुभव आणि प्रशासकीय कार्यक्षमता सरकारला धोरण ठरवण्यात मदत करेल. याशिवाय, डिजिटल इंडिया, बँकिंग सुधारणा आणि नवीन आर्थिक नियमांच्या अंमलबजावणीमध्येही त्यांची महत्त्वाची भूमिका असेल. त्यांच्या नेतृत्वाखाली सरकारी धोरणे अधिक प्रभावी बनवता येतील.

कोण आहेत शक्तिकांत दास?

शक्तिकांत दास यांचा जन्म 26 फेब्रुवारी 1957 रोजी भुवनेश्वर, ओडिशात झाला. त्यांनी दिल्ली विद्यापीठापासून ते ब्रिटनमधील बर्मिंगहॅम विद्यापीठापर्यंत शिक्षण घेतले आहे. 1980 च्या बॅचचे तामिळनाडू कॅडरचे आयएएस अधिकारी शक्तिकांत दास डिसेंबर 2018 मध्ये केंद्रीय बँकेचे गव्हर्नर बनले. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये ते निवृत्त झाले. अर्थ मंत्रालयातील त्यांच्या दीर्घ कारकिर्दीत, ते आठ केंद्रीय अर्थसंकल्पांच्या तयारीशी थेट जोडले गेले होते. कोरोना काळात देशाची अर्थव्यवस्था स्थिर ठेवल्यानंतर शक्तिकांत दास यांनी रशिया-युक्रेन संघर्षादरम्यानही आरबीआयचे नेतृत्व करताना चलनविषयक धोरणाबाबत अनेक कठोर निर्णय घेतले, ज्यामुळे भारताची अर्थव्यवस्था चांगल्या स्थितीत राहिली. महत्त्वाचे म्हणजे आरबीआय गव्हर्नर म्हणून केलेल्या कामगिरीमुळे शक्तिकांत दास यांना अमेरिकन मासिक ग्लोबल फायनान्सने तीनदा जगातील सर्वोत्तम केंद्रीय बँकर म्हणून निवडले. त्यापैकी त्यांना सलग दोनदा हा सन्मान मिळाला. 2024 च्या ग्लोबल फायनान्स सेंट्रल बँकर रिपोर्ट कार्ड्समध्ये त्यांना A+ रेटिंग देण्यात आले होते.

हेही वाचा – Chhava Movie : ‘छावा’ चित्रपट पाहताच दिल्लीत गोंधळ, अकबर-बाबर रोडच्या बोर्डवर लोकांनी फासलं काळं