Harish Salve : या वर्षी शिंदे गट विरूद्ध ठाकरे गट हा खटला सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरला. शिंदे गटाच्या बाजून वकील हरीश साळवे आणि ठाकरे गटाच्या वतीने कपिल सिब्ब्ल यांनी युक्तीवाद केला. ज्यानंतर राज्यातील सत्तासंघर्षावर दोन्ही बाजूच्यावतीने युक्तीवाद करणारे वकील हे चर्चेचा विषय ठरले आहेत. नुकतेच शिंदे गटाच्या बाजूने युक्तीवाद करणारे आणि देशाचे माजी सॉलिसिटर जनरल हरीश साळवे यांनी तिसऱ्यांदा संसार थाटला आहे. साळवे यांनी त्रिना यांच्यासोबत थाटामाटात लग्न केले आहे. त्रिना ही मुळची ब्रिटनची नागरिक असून साळवेंच्या या तिसऱ्या लग्नामध्ये नीता अंबानी यांच्यासह अनेक मोठे लोक उपस्थित होते. (Former Solicitor General of country and famous lawyer Harish Salve got married third time)
हेही वाचा – ‘भाजपला 25 आमदार निवडून देण्यात माझं योगदान’; पंकजा मुंडेंचा दावा
देशाचे माजी सॉलिसिटर जनरल आणि प्रसिद्ध वकील हरीश साळवे यांचे याआधी दोन लग्न झालेले आहेत. त्यांचे पहिले लग्न हे मीनाक्षी यांच्यासोबत झाले. जे 38 वर्ष टिकले. परंतु त्यानंतर त्यांनी 2020 मध्ये विभक्त होण्याचा निर्णय घेतला. साळवे आणि मीनाक्षी यांना साक्षी आणि सानिया नावाच्या दोन मुली आहेत. त्यानंतर साळवे यांनी कॅरोलिन ब्रॉसार्ड यांच्याशी दुसरा विवाह केला. परंतु त्यांचे हे नाते देखील फार काळ टिकू शकले नाही. त्यानंतर आता साळवे यांनी त्रिना यांच्यासोबत तिसऱ्यांदा बोहल्यावर चढले आहेत. साळवेंच्या या तिसऱ्या लग्नाला नीता अंबानी, ललित मोदी आणि उज्ज्वला राऊत यांच्यासह अनेक मोठे लोक उपस्थित होते. त्यामुळे सध्या साळवेंच्या या तिसऱ्या लग्नाची सर्वाधिक चर्चा करण्यात येत आहे.
सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस करणारे हरीश साळवे यांनी हायप्रोफाईल केस कुलभूषण जाधव यांच्यासह अनेक महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय खटले लढले आहेत. कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने हेरगिरीच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावली होती. परंतु त्यावेळी जाधव यांच्या बाजूने खटला लढण्यासाठी साळवे यांनी कायदेशीर शुल्क म्हणून केवळ 1 रुपयांचे मानधन घेतलं होते. ज्यामुळे त्यांचे जगभरातून कौतुक करण्यात आले होते. याशिवाय अनिल अंबानी यांच्या रिलायन्स नॅचरल रिसोर्सेस लिमिटेड विरुद्ध कृष्णा गोदावरी बेसिन गॅस विवाद प्रकरणंही हरिश साळवे यांनीच लढले होते. ज्यामुळे आज अनेक मोठे लोक हे साळवे यांचे प्रमुख क्लाइंट्स आहेत.