घरताज्या घडामोडीBabul Supriyo Joins TMC: भाजप नेते बाबुल सुप्रियो यांचा टीएमसीमध्ये प्रवेश

Babul Supriyo Joins TMC: भाजप नेते बाबुल सुप्रियो यांचा टीएमसीमध्ये प्रवेश

Subscribe

पश्चिम बंगालमध्ये भाजपला (BJP) मोठा धक्का बसला आहे. मोदी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री रहिलेले खासदार बाबुल सुप्रियो (Former Minister Babul Supriyo) यांनी तृणमुल काँग्रेसमध्ये (TMC Party) प्रवेश केला आहे. काही दिवसांपूर्वी बाबुल सुप्रियो यांनी भाजपला राजीनामा दिला होता. आज तृणमूल महासचिव अभिषेक बॅनर्जी (TMC General Secretary Abhishek Banerjee) आणि खासदार डेरेक ओ ब्रायन (MP Derek O’Brien) यांच्या उपस्थितीत सुप्रियो यांनी टीएमसीमध्ये प्रवेश केला आहे. टीएमसीमध्ये प्रवेश केल्यानंतर सुप्रियो म्हणाले की, ‘ते आसमसोलचे खासदारपदही सोडतील. सोमवारी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतील.’

बाबुल सप्रियो यांनी पक्षप्रवेश केल्यानंतर टीएमसीकडून आपले निवेदन जारी केले आहे. टीएमसीने सांगितले की, राष्ट्रीय महासचिव अभिषेक बॅनर्जी आणि राज्यसभेचे खासदार डेरेक ओ ब्रायन यांच्या उपस्थित माजी केंद्रीय मंत्री आणि सध्याचे खासदार बाबुल सुप्रियो यांनी टीएमसीमध्ये प्रवेश केला आहे. यानिमित्ताने आम्ही त्यांचे स्वागत करतो.

- Advertisement -

दरम्यान सुप्रियो यांचा सुरक्षा दर्जेतही आज बदल करण्यात आला आहे. बाबुल सुप्रियो यांच्या Z दर्जाच्या सुरक्षेऐवजी Y दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. केंद्राकडून बाबुल सुप्रियो यांना सुरक्षा दिली होती. आता सुप्रियो यांनी सीआरपीएफची सुरक्षा मिळाली आहे.

- Advertisement -

सुप्रियो यांनी टीएमसीमध्ये पक्षप्रवेश झाल्यानंतर पक्षाचे नेते कुणाल घोष म्हणाले की, भाजपचे काही नेते टीएमसीच्या संपर्कात आहेत. भाजपात ते समाधानी नाही आहेत. आज भाजपच्या एका नेत्याने टीएमसीमध्ये प्रवेश केला आहे. इतर नेतेही टीएमसीमध्ये येऊ इच्छित आहे. ही प्रक्रिया सुरू राहिलं. प्रतिक्षा करा आणि पाहत राहा.

जुलै महिन्यात माजी केंद्रीय मंत्री आणि बंगालमधील भाजपचे मोठे लोकप्रिय नेते बाबुल सुप्रियो यांनी राजकारणाला रामराम केला होता. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करून लिहिले होते की, राजकारणात फक्त समाजसेवा करण्यासाठी आलो होता. पण आता त्यांनी त्यांचा निर्णय बदलेला दिसत आहे.


हेही वाचा – यामुळे भाजप नेते बाबुल सुप्रियो यांनी राजकारणाला केला रामराम


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -