माजी केंद्रीय मंत्री पंडीत सुखराम शर्मा यांचे निधन

Former Union Minister Pandit Sukhram Sharma passes away
Former Union Minister Pandit Sukhram Sharma passes away

माजी केंद्रीय मंत्री पंडित खुराम यांचे निधन झाले. ते 94 वर्षांचे होते. त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. तेव्हापासूनच त्यांची प्रकृती नाजूक होती. शनिवारी प्रकृती त्यांची खालावल्याने त्यांना हेलिकॉप्टरने दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल कण्यात आले होते.

आश्रय शर्मा यांनी फेसबुक पोस्टद्वारे आजोबांच्या निधनाची माहिती दिली होती. गुडबाय आजोबा, फोन अजून वाजणार नाही., असे त्यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे. यासोबत त्यांनी आजोबांसोबतचा एक फोटोही शेअर केला आहे. दरम्यान, फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी सुखकुमार यांचे निधन कधी झाले याचा कोणताही उल्लेख केलेला नाही.

आज पंडीत सुखराम यांचे पार्थिव दिल्लीहून हिमाचल प्रदेश येथील मंडीमध्ये आणले जाणार आहे. सलापड, सुंदरनगर, नाचन आणि बाल्हसह मंडी सदरमध्ये पंडित सुखराम यांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. यासठी मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहतील. उद्या सकाळी 11 वाजता पंडीत सुखराम यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी मंडी शहरातील ऐतिहासिक सेरी व्यासपीठावर ठेवण्यात येणार असून, त्यानंतर हनुमानघाट येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, अशी माहिती त्यांच्या कुटुंबाने दिली आहे.

जमान दौरा आणि मोबाईल –

पंडीत सुखराम हे दूरसंचार मंत्री असताना जपानच्या दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी कार चालकाच्या खिशात मोबाईल फोन पाहिला होता. जपानमध्ये असे तंत्रज्ञान असू शकते मग, भारतात का नाही? असा विचार त्यांनी केला. त्यानंतर भारतात मोबाइल फोन सेवा सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. एका जाहीर सभेतही त्यांनी येणाऱ्या काही वर्षात तुमच्या खिशात मोबाइल फोन असेल असे म्हटले. त्यावेळी लोकांनी या वक्तव्याला हसण्यावारी नेले होते.

राजकीय प्रवास –

हिमाचल प्रदेशमधून त्यांनी आपला राजकीय प्रवास सुरू केला. त्यांनी पाच वेळेस विधानसभा आणि तीन वेळेस लोकसभा निवडणूक लढवली होती. वर्ष 1963 ते 1984 या काळात ते आमदार होते. 1984 मध्ये लोकसभेवर निवडून आले आणि राजीव गांधी सरकारमध्ये राज्यमंत्री झाले. 1996 मध्ये मंडीतून पुन्हा विजयी झाले आणि दूरसंचार मंत्री झाले. त्यांना काँग्रेसने पक्षातून काढल्यानंतर 1997 मध्ये हिमाचल विकास काँग्रेसची स्थापना केली आणि 1998 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपसोबत युती करून सरकारमध्ये सामील झाले. सुखराम यांच्यासह त्यांचे पाच आमदार मंत्री झाले. त्यांचा मुलगा अनिल शर्मा 1998 मध्ये राज्यसभेवर निवडून आला होता. 2003 मध्ये मंडीतून सुखराम पुन्हा विजयी झाले आणि यावेळी त्यांनी काँग्रेसशी हातमिळवणी केली. वर्ष 2017 मध्ये सुखराम यांनी आपल्या मुलासह भाजपमध्ये प्रवेश केला होता. परंतु दोन वर्षांत त्यांनी काँग्रेसमध्ये ‘घर वापसी’ केली. सुखराम यांचा मुलगा अनिल शर्मा हा मंडीतून भाजपचा आमदार आहे.