घरताज्या घडामोडीअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल; नेमके प्रकरण काय?

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल; नेमके प्रकरण काय?

Subscribe

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले. पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्सच्या भरपाईच्या प्रकरणी डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले. पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्सच्या भरपाईच्या प्रकरणी डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे अशा प्रकारची नामुष्की ओढवलेले डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे पहिलेच माजी राष्ट्राध्यक्ष ठरलेत. (Former US President Donald Trump Faces Criminal Charges)

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले असले तरी, अद्याप नेमके आरोप काय आहेत? ते सार्वजनिक करण्यात आलेले नाही. परंतु, आरोपपत्र दाखल झाल्याने ट्रम्प यांच्याविरोधात खटला भरवला जाईल.

- Advertisement -

नेमके प्रकरण काय?

२०१६ च्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या वेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्सला काही न बोलण्यासाठी दिलेल्या पैशांचे हे प्रकरण आहे. तसेच, याप्रकरणी पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्सच्या वकिलांनी सांगितले की, माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल होणे आणि त्यानंतर त्यांच्याविरोधात खटला चालणार ही बाब समोर येणे म्हणजे कायद्यापेक्षा मोठं कुणीही नाही हेच दाखवून देणारे उदाहरण ठरले आहे.

- Advertisement -

ट्रम्प यांच्यावरील आरोप काय?

मिळालेल्या माहितीनुसार, ट्रम्प यांच्यासोबतच्या प्रेमप्रकरणाची कुठेही वाच्यता करू नये, यासाठी स्टॉर्मी डॅनियलला १ लाख ३० हजार डॉलर एवढी रक्कम देण्यात आली, अशी माहिती मॅनहॅटन जिल्ह्याचे वकील अलविन ब्रॅग यांनी न्यू यॉर्क ग्रँड ज्युरी न्यायालयात पुरावा सादर करताना दिली. दरम्यान, स्टॉर्मीचे खरे नाव स्टेफनी क्लिफॉर्ड आहे. ट्रम्प राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा प्रचार करत असताना ही रक्कम देण्यात आली, असा आरोपही करण्यात आला आहे.

दरम्यान, ट्रम्प यांचे वकील मायकल कोहेन यांनी हे पैसे क्लिफॉर्डला दिले आणि त्यानंतर ट्रम्प यांनी मायकल कोहेन यांना या पैशांची भरपाई करून दिली.


हेही वाचा – मागासवर्गीयांच्या कल्याण योजनांना अर्थसंकल्पात मोठा फटका; राज्य सरकारकडून विविध योजनांमध्ये

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -