घरदेश-विदेशअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अटक होण्याची शक्यता; वाचा काय आहे...

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अटक होण्याची शक्यता; वाचा काय आहे प्रकरण

Subscribe

एका महिलेच्या कथित प्रकरणात अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना अटक करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ट्रम्प यांनी त्यांना अटक झाल्यास त्यांच्या सर्थकांना रस्त्यावर उतरण्याचे आवाहन केले आहे.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आज (ता. २१ मार्च) अटक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. एका पॉर्न अभिनेत्रीला पैसे दिल्याच्या प्रकरणावरून ट्रम्प यांना अटक करण्यात येऊ शकते, अशी माहिती समोर आली आहे. जर का ट्रम्प यांना अटक करण्यात आली तर त्यांच्या समर्थकांनी रस्त्यावर उतरून त्यांच्या समर्थनात आंदोलन करावे, असे आवाहन डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून करण्यात आले आहे. ज्यामुळे न्युयॉर्क पोलिसांनी सोमवारी अनेक ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त ठेवला होता. तर या गोष्टीचा निषेध करण्यासाठी सोमवारी संध्याकाळी काही ट्रम्प समर्थक न्यूयॉर्कमध्ये जमले होते.

जर या प्रकरणात ट्रम्प यांच्यावर आरोप दाखल झाला तर ते अमेरिकेचे पहिले माजी राष्ट्राध्यक्ष असतील ज्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर अशा पद्धतीने गुन्हा दाखल होणे हे 2024 च्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी त्यांच्या संधींनाही धक्का देणारे ठरेल. दरम्यान, ट्रम्प यांनी सोशल मीडियावर केलेल्या त्यांच्या पोस्टमध्ये दावा केला आहे की, मॅनहॅटनचे वकीलांनी ‘हश मनी’ प्रकरणात त्यांच्यावर आरोप लावले तर मंगळवारी त्यांना अटक होऊ शकते.

- Advertisement -

काय आहे प्रकरण?
डोनाल्ड ट्रम्प यांचे अमेरिकेतील पॉर्न अभिनेत्री स्टॉर्मी डेनियलशी प्रेमसंबंध होते आणि याबाबची माहिती लपवण्यासाठी ट्रम्प यांनी 2016 मध्ये स्टॉर्मी डेनियलला एक लाख 30 हजार डॉलर्स दिले, असा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणात ट्रम्प यांच्यावर आरोप लावायचे की नाही याचा विचार सरकारी वकीलांकडून करण्यात येत आहे. तर मॅनहॅटन डिस्ट्रिक्ट अॅटर्नीने माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना दोषी ठरवले तर ते पहिले माजी राष्ट्राध्यक्ष असतील, ज्यांच्यावर आरोप करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रम्पच्या वकिलांनी शुक्रवारी संध्याकाळी सांगितले की मॅनहॅटन ग्रँड ज्युरीने दोषी ठरवले तर ट्रम्प हे फौजदारी आरोपांना सामोरे जाण्यास शरण येईल. विशेष म्हणजे, ट्रम्प आणि पॉर्न अभिनेत्री स्टॉर्मी डेनियलचे अफेअर उघडकीस आल्यानंतर ट्रम्प यांनी हे मान्य करण्यास नकार देत असे काहीही संबंध नसल्याचे सांगत या गोष्टीला नकार दिला होता.


हेही वाचा – राहुल गांधींची ‘मीर जाफर’शी तुलना; परदेशातील वक्तव्यावरून भाजपा माफीवर ठाम

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -