खाद्य तेल झाले स्वस्त; “या” कंपनीने प्रति लिटर ३० रुपये घटवले

६ जुलै रोजी खाद्य तेल कंपन्यांसोबत अन्न मंत्रालयाने बैठक बोलावली होती. या बैठकीत ग्राहकांना स्वस्त तेल उपलब्ध व्हावं याकरता तेलाच्या किमतीत घट करण्याचे निर्देश दिले होते.

oil

गेल्या काही महिन्यांपासून देशात खाद्यतेलाच्या (Edible Oil) किंमती सातत्याने वाढत होत्या. वाढत्या महागाईला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारकडून विविध उपाययोजना सुरू आहेत. त्यातच, अदानी विल्मरच्या (Adani Wilmer) फॉर्च्युन ब्रॅण्डने (Fortune oil) तेलाच्या किमतीत घट केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती घटल्याने फॉर्च्युन ब्रॅण्डनेही ३० रुपयांनी तेल स्वस्त केलं आहे. (Fortune oil decreases 30 rupees in a litter)

हेही वाचा – खाद्यतेलाच्या आयातीपेक्षा उत्पादन वाढवण्याची गरज!

“आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमतीत घट झाल्याने आणि कमीत कमी पैशांत ग्राहकांना तेल उपलब्ध व्हावे याकरता सरकारच्या योजनांच्या अनुषंगाने अदानी विल्मरने खाद्य तेलाच्या किंतमीत घट केली आहे. गेल्या महिन्यातही कंपनीने तेल स्वस्त केले होते,” अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली.

दरम्यान, ६ जुलै रोजी खाद्य तेल कंपन्यांसोबत अन्न मंत्रालयाने बैठक बोलावली होती. या बैठकीत ग्राहकांना स्वस्त तेल उपलब्ध व्हावं याकरता तेलाच्या किमतीत घट करण्याचे निर्देश दिले होते.

सोबायीन तेलात सर्वाधिक घट करण्यात आली आहे. याआधी धारा ब्रॅण्डच्या मदर डेअरनेही खाद्य तेलाच्या किमतीत घट केली होती. त्यांनी सोयाबीन आणि राईस ब्रान तेल १४ रुपयांनी स्वस्त केले होते.

हेही वाचा– खाद्यतेलाच्या किंमतीत १५ रूपयांची घट, केंद्र सरकारचे निर्देश

फॉर्च्युन सोयाबीन तेल १९५ वरून १७५ रुपये प्रति लीटर झाले आहे. सूर्यफुलाचे तेल २१० वरून १९९ रुपये प्रति लिटर झाले आहे. राईचे तेल १९५ वरून १९० रुपये प्रति लिटर करण्यात आले आहे. फॉर्च्युन राइस ब्रान तेल २२५ रुपयांवरून २१० रुपये प्रति लिटर करण्यात आले आहे.

तर, अदाणी विल्मरचे मुख्य कार्यकारी अधिकारी आंग्शू मलिक यांनी म्हटलं आहे की, जागतिक बाजारात तेलाच्या किंमतीत घट झाल्याने आम्ही आमच्या ग्राहकांनासाठी किंमती कमी केल्या आहेत. नव्या किमतीतीतल तेल लवकरच बाजारात उपलब्ध होणार आहे.