मोबाईलचा अतिवापर ठरतोय जीवघेणा, मागील पाच वर्षांत घडल्या ४० हजार दुर्घटना

कोणतेही वाहन चालवताना फोनचा वापर करू नये, अशा सूचना अनेकवेळी दिल्या जातात. या सूचना आपल्याला राज्य सरकारकडून वारंवार दिल्या जातात. तरीदेखील लोकांकडून आणि चालकांकडून अशा प्रकारच्या महत्त्वाच्या सूचनांकडे दुर्लक्ष केलं जातं. त्यामुळे भयावह दुर्घटना या घडत असतात. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अहवालानुसार, गेल्या पाच वर्षांमध्ये ४० हजार दुर्घटना घडल्या आहेत. मोबाईल फोनच्या अतिवापरामुळे जवळपास ४० हजार दुर्घटना घडल्या आहेत.

२०१६ मध्ये वाहन चालवताना मोबाईलच्या वापरामुळे ४९७६ अपघात झाले होते, तर २०१७ मध्ये मोबाईलच्या वापरामुळे ८५२६ अपघात झाले होते. २०१८ मध्ये मोबाईलच्या वापरामुळे ९०३० अपघात झाले होते, तर २०१९ मध्ये हा आकडा १०५२२ वर पोहोचला होता.२०२० मध्ये मोबाईलवर बोलल्यामुळे ६७५३ अपघात झाले होते.

काय आहेत दुचाकी अपघाताची कारणं?

डॉ.रवींद्र कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाइकचा तोल आणि स्थिरता कमी असते. त्यामुळे लहानशा खड्ड्यावर जरी बाइक पडली तरी दुचाकी डिसबॅलन्स होते. त्यामुळे अपघात होतात. यामुळे बाइकमधील लोड फॅक्टरही कमी होतो, मग ती हलकी बाइक असो किंवा बाइकवर फक्त एकच व्यक्ती असेल, खड्ड्यांवर पडल्यास बाइक त्वरीत डिसबॅलन्स होते. त्यामुळे दुचाकीस्वारांच्या अपघातांचे प्रमाण अधिक आहे. खड्ड्यात आदळल्याने दुचाकीचा तोल लवकर सुटतो. तसेच, दुचाकीस्वार बहुधा पुढे जाणाऱ्या मोठ्या कारपासून अंतर ठेवतात.

आयआयटी बीएचयूचे सिव्हिल इंजिनीअरिंगचे प्राध्यापक डॉ. अंकित गुप्ता म्हणतात की, दुचाकी चालवणाऱ्याने हेल्मेट घालणं आवश्यक आहे. अनेक अपघातांमध्ये दुचाकी चालकांचा मृत्यू हेल्मेट न घातल्याने दिसून येते. हेल्मेट काटेकोरपणे घातल्यास अपघात कमी होऊ शकतात.

NCRB डेटाने केलेल्या विश्लेषणानंतर असे आढळून आले की, देशात दर तासाला १८ लोक रस्ते अपघातात आपला जीव गमावत आहेत तर दर ६० मिनिटाला ४८ अपघात होतात. एनसीआरबीचे आकडे या वस्तुस्थितीकडे लक्ष वेधतात की ओव्हर स्पीडिंगचा थरार मृत्यूच्या व्यवहारात बदलत आहे. २०१९ मधील एकूण रस्ते अपघातांपैकी ५९.६ अपघात हे वेगामुळे झाले. त्यामुळे ३६५ दिवसांत ८६,२४१ जणांचा मृत्यू झाला आहे, तर २ लाख ७१ हजार ५८१ जण जखमी झाले आहेत.

भारतात रस्ते अपघातांमुळे होणारे नुकसान ५.९६ लाख कोटी रुपये आहे, जे देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) ३.१४ टक्के इतके आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने केलेल्या अभ्यासानुसार भारतातील रस्ते अपघातांमुळे होणारे सामाजिक आणि आर्थिक नुकसान १,४७,११४ कोटी रुपये आहे.


हेही वाचा : नवी मुंबईत तांदूळ आणि आंबा महोत्सव, कधी होणार जाणून घ्या?