घरताज्या घडामोडीOYO हॉटेलमध्ये जोडप्यांचे व्हिडीओ बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

OYO हॉटेलमध्ये जोडप्यांचे व्हिडीओ बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Subscribe

उत्तर प्रदेशातील नोएडातील ओयो हॉटेलमध्ये छुपे कॅमेरे लावून जोडप्यांचे खासगी क्षण रेकॉर्ड करणाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी 4 जणांना अटक केली आहे. नोएडातील गुन्हेगारी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या अन्य टोळ्यांशीही आरोपींचा संबंध होता, असेही सांगण्यात आले आहे.

उत्तर प्रदेशातील नोएडातील ओयो हॉटेलमध्ये छुपे कॅमेरे लावून जोडप्यांचे खासगी क्षण रेकॉर्ड करणाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी 4 जणांना अटक केली आहे. नोएडातील गुन्हेगारी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या अन्य टोळ्यांशीही आरोपींचा संबंध होता, असेही सांगण्यात आले आहे. याशिवाय, ही टोळी जोडप्यांचे व्हिडीओ रेकॉर्ड करून, त्यांना ब्लॅकमेल करून, त्यांच्याकडून पैशांची मागणी करायची. मात्र पैसे न दिल्यास व्हिडिओ लीक करण्याची धमकी द्यायची. (four arrested for making videos of couples by installing hidden cameras in oyo hotel)

पोलिसांनी याप्रकरणी अधिक तपास केला असता हॉटेलच्या कर्मचाऱ्यांचा या रॅकेटमध्ये सहभाग नसल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, टोळीच्या सदस्यांनी आधी ओयो हॉटेल्समधील खोल्या बुक केल्या. त्यानंतर चेकआउट करण्यापूर्वी आरोपींनी खोल्यांमध्ये छुपे कॅमेरे लावले. काही दिवसांनी हे लोक पुन्हा हॉटेल्समध्ये गेले आणि त्यांनी कॅमेरे बाहेर काढले. त्यानंतर त्यांनी जोडप्यांशी संपर्क साधून पैशांची मागणी केली. पैसे देण्यास नकार देणाऱ्यांना आरोपींनी व्हिडिओ लीक करण्याची धमकी दिली होती.

- Advertisement -

याप्रकरणी पोलिसांनी विष्णू सिंग, अब्दुल वहाव, पंकज कुमार आणि अनुराग कुमार सिंग या चार जणांना अटक केली आहे. तसेच, ही चार जण नोएडामध्ये कार्यरत असलेल्या तीन वेगवेगळ्या टोळ्यांचा भाग असल्याचे सांगितले जाते. हे गट अनधिकृत कॉल सेंटरसाठी बनावट सिमकार्ड देणे आणि बेकायदेशीर कृत्यांसह अनेक बेकायदेशीर कामांमध्ये गुंतले होते.

“आरोपी विष्णू आणि अब्दुल वहाव हे दाम्पत्याच्या फोनवर जिव्हाळ्याच्या क्षणांचे व्हिडिओ पाठवत होते आणि त्यांच्याकडे पैसे मागायचे, मागणी पूर्ण न झाल्यास व्हिडिओ ऑनलाइन पोस्ट करायचे. तिसरा आरोपी पंकज हा खंडणीसाठी इतर व्यक्तींच्या नावे नोंदणीकृत सिम आणि खात्याची व्यवस्था करायचा”, असे या टोळीच्या कार्यपद्धतीबद्दल माहिती देताना वरिष्ठ पोलिस अधिकारी साद मियाँ खान यांनी सांगितले.

- Advertisement -

या आरोपींना अटक केल्यानंतर त्यांच्याकडून 11 लॅपटॉप, 7 सीपीयू, 21 मोबाईल, विविध बँकांचे 22 एटीएम कार्ड, एक पॅनकार्ड, एक आधार कार्ड, 14 बनावट आय फार्मा आणि मोठ्या प्रमाणात बनावट कागदपत्रे, आय कार्ड, सिमकार्ड्स असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली.


हेही वाचा – दिवाळीनंतर फराळ बनवा; आनंदाचा शिधा वाटपाला आजपासून होणार सुरुवात

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -