घरताज्या घडामोडीमणिपूरमध्ये दहशतवादी हल्ला; आसाम रायफल्सचे ४ जवान शहीद

मणिपूरमध्ये दहशतवादी हल्ला; आसाम रायफल्सचे ४ जवान शहीद

Subscribe

भारताच्या म्यानमारजवळील सीमेवर दहशतवादी हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात चार आसाम रायफलचे जवान शहीद झाले आहेत. तर या दहशतवादी हल्ल्यात इतर चार जवान जखमी झाले आहेत.

एकीकडे कोरोना विषाणूने जगभर थैमान घातले असताना दुसरीकडे भारताच्या म्यानमारजवळील सीमेवर दहशतवादी हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात चार आसाम रायफलचे जवान शहीद झाले आहेत. तर या दहशतवादी हल्ल्यात इतर चार जवान जखमी झाले आहेत. हा हल्ला पिपल्स लिबरेशन आर्मीने (पीएलए) केल्याचे वृत्त एएनआय या वृत्तसस्थेने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे.

- Advertisement -

म्यानमारजवळील सीमेवर करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आसाम जवानांवर गोळीबार करण्यात आला. इंफाळपासून सुमारे १०० किमीच्या अंतरावर असलेल्या चंदेल जिल्ह्यात हा हल्ला करण्यात आला आहे. दरम्यान, भारतीय लष्कराकडून या भागात अतिरेक्यांना शोधण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. या बरोबरच भारत आणि म्यानमार सीमेवर देखील बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

टाइम्स नाऊ या वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, मणिपूरमधील पीएलएच्या अतिरेक्यांनी आज सकाळच्या सुमारास हल्ला केला आहे. दहशतवाद्यांनी सर्वप्रथम आयईडीचा स्फोट घडवून आणला, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. नंतर आसाम रायफल्सच्या जवानांवर गोळीबार केला. या हल्ल्यात चार आसाम रायफल्सचे जवान शहीद झाले असून चार जण जखमी झाले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – दिलासा! दिल्लीत डिझेलच्या किंमतीत घसरण; डिझेलवरील VAT १६ टक्क्यांनी कमी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -